नवरात्री विशेष : पायनॅपल बर्फी

शनिवार, 17 ऑक्टोबर 2020 (12:42 IST)
नवरात्र सुरु झाले आहे. नवरात्रात बरेच लोकं उपवास धरतात. बहुदा लोकं या उपवासात मीठ खातात तर कोणी मीठ खात नाही, फळे किंवा काही गोड धोड घेतात. जर आपल्याला गोड खाणं आवडत असल्यास आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत चविष्ट मावा- पाईनॅपल बर्फी. यंदाच्या नवरात्रात आपण नक्की हे करून बघा. आपल्याला हे आवडणारच. 
 
साहित्य : 
1 अननस गोल कापलेलं, 1 कप ताजा मावा, वेलची पूड, केशर, 1 थेंब खायचा पिवळा रंग, साखर चवीप्रमाणे.
 
कृती : 
सर्वप्रथम एका भांड्यात पायनॅपल घाला, त्यावरून साखर भुरभुरून द्या. कुकरच्या तळाशी थोडं पाणी घाला आणि त्या भांड्याला कुकर मध्ये ठेवा. 15 ते 20 मिनिटे मंद आंचेवर शिजवा. गार झाल्यावर मिक्सर मध्ये वाटून त्याला गाळून त्याचे गर काढून तयार करून घ्या.
 
आता एका कढईत पायनॅपलचे तयार गर आणि साखर मिसळून मंद आचेवर ते घट्ट होई पर्यंत ढवळत राहावं. एका कढईत मावा किंवा खवा भाजून घेणे, माव्याला पायनॅपलच्या मिश्रणात मिसळून घट्ट होई पर्यंत भाजावं. वरून वेलची पूड, पिवळा रंग आणि केशर घालून मिसळा. आता एका ताटलीत तुपाचा हात लावून मिश्रणाला पसरवून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर आणि घट्ट झाल्यावर सुरीने त्याचे वडीच्या आकाराचे काप करा. चविष्ट अशी ही मावा - पायनॅपल बर्फी खाण्यासाठी तयार. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती