Festivals Recipes: रंगपंचमीला बनवा सफरचंद हलवा

मंगळवार, 18 मार्च 2025 (15:48 IST)
साहित्य-
सफरचंद- अर्धा किलो 
तूप- दोन टेबलस्पून
खवा- १५० ग्रॅम
साखर-अर्धी वाटी
मीठ- १/४ टीस्पून
लिंबाचा रस- अर्धा टीस्पून 
नारंगी रंग
वेलची पूड 
नारळ किस 
केशर 
काजू 
पिस्ता 
मनुके 
ALSO READ: खजुराचा हलवा रेसिपी
कृती-
सर्वात आधी सफरचंद स्वच्छ धुवून घ्या व कापडाने कोरडे करून आता किसून घ्या,  तसेच काजू, पिस्ता, नारळ, बदाम आणि मनुके बारीक चिरून एका प्लेटमध्ये ठेवा. एका भांड्यात तीन चमचे दूध घाला आणि दुधात केशर घाला. आता किसलेल्या सफरचंदात चिमूटभर मीठ आणि लिंबाचा रस मिसळा. आता पॅन घेऊन तूप घाला. तुपात काजू, बदाम आणि पिस्ता भाजून घ्या. व ते एका प्लेट मध्ये काढा. आता परत एक चमचा तूप घाला. व किसलेले सफरचंद घाला व परतवून घ्या. आता नारंगी रंग मिक्स करून  ते कमीतकमी १० मिनिटे शिजवा. सफरचंद किस मऊ झाल्यावर, खवा घाला व आणखी ५ मिनिटे शिजवा. आता त्यामध्ये साखर मिसळा व नंतर त्यात केशर घाला आणि मिक्स करा. काजू, बदाम, पिस्ता, किश्की आणि नारळ किस घालून मिक्स करा. आता वरून एक चमचा तूप घालून मिक्स करा. तयार हलवा एका बाउल मध्ये काढा. तर चला तयार रंगपंचमी विशेष सफरचंद हलवा रेसिपी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Festival Special Recipe काजू कतली
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: गुलकंद करंजी रेसिपी

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती