Rangpanchami 2025 होळीनंतर रंगपंचमी कधी साजरी केली जाते? मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या
शनिवार, 15 मार्च 2025 (16:37 IST)
Rangpanchami 2025 दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. मध्य प्रदेशातील मालवा प्रांतातील प्रमुख शहरांमध्ये (इंदूर, उज्जैन, देवास इत्यादी)
हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवशी लोक एकमेकांना गडद रंग लावून शुभेच्छा देतात. देशाच्या वेगवेगळ्या भागात या दिवशी विविध परंपरा देखील पाळल्या जातात. जाणून घ्या यावेळी रंगपंचमी कधी आहे आणि ती का साजरी केली जाते...
रंगपंचमी 2025 कधी आहे, आपण ती का साजरी करतो?
फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. यावेळी ही तारीख १९ मार्च, बुधवार आहे, म्हणजेच या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाईल. तिथी आणि मुहूर्त जाणून घ्या-
हिंदू पंचागानुसार रंगपंचमी तिथी 18 मार्च रात्री 10 वाजून 09 मिनिटापासून सुरु होईल आणि 20 मार्च रात्री 12 वाजून 36 मिनिटाला संपेल. उदयातिथी बघता रंगपंचमी 19 मार्च रोजी साजरी केली जाईल.
रंगपंचमी 2025 शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त- संध्याकाळी 04.51 ते संध्याकाळी 5.38 पर्यंत
विजय मुहूर्त - दुपारी 02.30 ते दुपारी 03.54 पर्यंत
गोधूली मुहूर्त - संध्याकाळी 6.29 ते संध्याकाळी 06.54 पर्यंत
निशिता मुहूर्त - रात्री 12.05 ते रात्री 12.52 पर्यंत
धार्मिक मान्यतेनुसार रंगपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांनी सोबत होळी खेळली होती. ही होळी बघण्यासाठी देवी-देवता देखील पृथ्वी लोकावर आले होते. याच कारणामुळे रंगपंचमी दरवर्षी साजरी केली जाते.
पौराणिक कथेनुसार, जेव्हा हिरण्यकश्यपू आपल्या बहिणी होलिकासोबत आपला मुलगा प्रल्हादला मारण्यासाठी अग्नीत बसला होता, तेव्हा दोघेही 5 दिवस त्या अग्नीत बसून राहिले. पाचव्या दिवशी होलिका मरण पावली आणि प्रल्हाद वाचला. हे पाहून लोक उत्साहित झाले आणि सर्वांनी रंगांनी आनंद साजरा केला. तेव्हापासून रंगपंचमीचा सण साजरा केला जातो.
मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील करिला गावात असलेल्या राम जानकी मंदिरात रंगपंचमीला मेळा भरतो. या मंदिरात माता जानकी, त्यांचे पुत्र लव-कुश आणि गुरु वाल्मिकी यांच्या मूर्ती स्थापित आहेत. असे म्हटले जाते की सीते मातेने येथे लव-कुशला जन्म दिला.