Rangpanchami Ger जगप्रसिद्ध इंदूरची रंगपंचमी, काय आहे खास जाणून घ्या

सोमवार, 17 मार्च 2025 (17:12 IST)
Rangpanchami Ger देशभरात होळीचा सण संपला असला तरी, जर तुम्हाला अजूनही होळीचे रंग पहायचे असतील आणि त्यात भिजायचे असतील, तर १९ मार्च रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथेली गेरमध्ये सामील व्हा. इंदूरमध्ये रंगपंचमीची तयारी सुरू झाली आहे. १९ मार्च रोजी टोरी कॉर्नर, संगम कॉर्नर आणि मारल क्लब येथून मिरवणूक काढण्यात येईल. या मेळ्यांमध्ये रंगांचा एक सुंदर दृश्य पाहायला मिळेल. सुमारे ३०० वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा पाहण्यासाठी लोक दूरदूरून येथे येतात.
 
मालवा प्रदेशात होळीनंतर रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. असे म्हटले जाते की इंदूरमध्ये रंगपंचमीला गेर काढण्याची परंपरा होळकर राजवंशाकडून सुमारे ३०० वर्षांपूर्वी सुरू झाली. या दिवशी होळकर राजघराण्याचे लोक सामान्य लोकांसोबत होळी खेळण्यासाठी बाहेर पडत असत आणि संपूर्ण शहरात फिरत असत. भेदभाव दूर करणे आणि बंधुता वाढवणे हा यामागील उद्देश होता.
 
होळकरांच्या काळापासून राजवाड्यात रंगांचा सण उत्साहाने साजरा केला जात असला तरी संघटनेच्या बॅनरखाली होळीच्या रंगता रंणार्‍यांची टोळी काढण्याची परंपरा ७५ वर्षांपेक्षाही आधीची आहे. त्याची सुरुवात प्रथम टोरी कॉर्नरपासून सुरु झाली. या गेरला धर्माशी जोडण्यासाठी तसेच महिलांचा सहभाग वाढवण्यासोबतच आणि त्याला कौटुंबिक स्वरूप देण्यासाठी सुमारे २७ वर्षांपूर्वी राधाकृष्ण फाग यात्रा सुरू करण्यात आली होती.
 
एकेकाळी शहरातील मधोमध टोरी कार्नर याची खास ओळख होती. देशातील प्रमुख राजकीय मुद्द्यांवर आणि शहराशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण होते. आकाशवाणीवरील बातम्या ऐकण्यासाठी लोक येथे येत असत. येथेच रंगांनी भरलेली एक कढई तयार करण्यास सुरुवात केली गेली, ज्यामध्ये लोकांना धरुन बुडवले जात होते. यानंतर लोक रंगांनी भरलेल्या बादल्या घेऊन राजवाड्यात जमू लागले. गेरचा आकार वाढतच गेला. त्यावेळी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये पाण्याचा दाब इतका होता की मोटारशिवाय पाणी तीन मजल्यापर्यंत पोहोचू शकत होते. सर्वात जुना रथ बाहेर काढण्यास सुरुवात झाली.
 
नंतर 70 वर्षांपूर्वी संगम कार्नर येथून गेर सुरु झाली. यात पहिल्यांदा हत्ती, घोडे आणि ऊंट बघायला मिळाले. नंतर मिसाइलद्वारे रंग-गुलाल उडवण्याचा प्रयोग देखील लोकांना खूप आवडला. वेळोवेळी अनेक बदल घडले. आता यात नैसर्गिक रंगाचा प्रयोग देखील सुरु करण्यात आला आहे.
 
एक वेळ अशी देखील आली जेव्हा हुडदंग करणारे वाढत गेले आणि यामुळे लोक कुटुंबासह गेरमध्ये सामील होण्यास टाळाटाळ करू लागले. अशात नृसिंह बाजार येथून राधाकृष्ण फाग यात्रा सुरू करण्यात आली. यामध्ये यात्रेला धार्मिक आणि सभ्य स्वरूप देऊन महिलांचा सहभाग वाढू लागला. रंगपंचमीला पुन्हा एकदा मूळ स्वरूपात मिरवणूक काढली जाईल. यावेळी पुन्हा एकदा कुटुंबासोबत येणाऱ्या महिलेसाठी विशेष सुरक्षा प्रदान करण्यात येऊ लागली.
ALSO READ: रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा Rangpanchami 2025 Wishes In Marathi
गेल्या वर्षीप्रमाणेच, या वर्षीही, प्रशासन गैर मार्गावरील घरांच्या छतावरून लोकांना त्यांच्या सोयीसाठी गेर पाहण्याची व्यवस्था करत आहे. गेर लाईव्हचा आनंद घेण्यासाठी, सुमारे आठ घरांच्या छतावर लोकांसाठी बसण्याची व्यवस्था केली जात आहे. ही सुविधा मिळविण्यासाठी, बुक माय शो वर ऑनलाइन बुकिंगची सुविधा दिली जात आहे. ज्यांचे बुकिंग सोमवारपासून सुरू झाली आहे.
 
इंदूरचा गेर महोत्सव पाहण्यासाठी लोक दूरदूरून येतात. अशात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा उत्सव भव्य पद्धतीने साजरा करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती