वाढदिवसानिमित्त लाडक्या दादासाठी बनवा; बदाम चॉकलेट बाइट्स रेसिपी

मंगळवार, 24 फेब्रुवारी 2026 (16:14 IST)
बदाम चॉकलेट बाइट्स ही एक अतिशय पौष्टिक, कुरकुरीत आणि बनवायला सोपी रेसिपी आहे.  झटपट तयार होणारी बदाम चॉकलेट बाइट्सची रेसिपी तुम्ही वाढदिवसानिमित्त नक्कीच बनवू शकतात. 
 
साहित्य-
बदाम-१ वाटी अक्खे किंवा काप केलेले 
डार्क किंवा मिल्क चॉकलेट- २०० ग्रॅम तुकडे केलेले 
मध किंवा गूळ पावडर- २ चमचे 
साजूक तूप किंवा बटर-१ छोटा चमचा
मीठ चिमूटभर  
 
कृती-
सर्वात आधी एका कढईत बदाम मध्यम आचेवर ५-७ मिनिटे खमंग भाजून घ्या. बदाम कुरकुरीत झाले की ते एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या. आता एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. त्यावर दुसरे काचेचे किंवा स्टीलचे भांडे ठेवा त्या भांड्यात चॉकलेटचे तुकडे आणि तूप घालून ते पूर्णपणे वितळेपर्यंत हलवत राहा. चॉकलेट एकदम स्मूथ झाले की गॅस बंद करा. वितळलेल्या चॉकलेटमध्ये भाजलेले बदाम आणि चिमूटभर मीठ टाका. सर्व बदाम चॉकलेटमध्ये व्यवस्थित घोळले जातील याची खात्री करा. आता एका ट्रेवर बटर पेपर किंवा फॉईल पेपर लावा. चमच्याच्या साहाय्याने थोडे थोडे मिश्रण  पेपरवर अंतरा अंतरावर ठेवा. हा ट्रे फ्रिजमध्ये ३० ते ६० मिनिटांसाठी ठेवा, जेणेकरून चॉकलेट चांगले सेट होईल.
 
काही खास टिप्स
फ्लेवर: तुम्ही यात थोडी वेलची पूड किंवा व्हॅनिला एसेन्स देखील घालू शकता.
डेकोरेशन: चॉकलेट सेट होण्यापूर्वी वरून थोडे किसलेले खोबरे किंवा पिस्त्याचे काप टाकू शकता.
स्टोरेज: हे बाइट्स एअरटाईट डब्यात भरून फ्रिजमध्ये १५-२० दिवस आरामात टिकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Palak Paneer Samosa Recipe ताईचा वाढदिवस आहे का? तर पालक पनीर समोसा बनवून द्या सरप्राईज
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: वाढदिवसासाठी अतिशय शाही आणि चविष्ट पर्याय रबडी गुलाब जामुन केक

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती