31 महिन्यांत सेन्सेक्सने सर्वांत उच्चांक गाठला

मंगळवार, 7 सप्टेंबर 2010 (11:40 IST)
मुंबई शेअरबाजाराने आज गेल्या 31 महिन्यांत सर्वात मोठा उच्चांक गाठला आहे. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये तब्बल 338.62 अंशांची वाढ झाली आहे. अमेरिकेतील खासगी सेवाक्षेत्रातील रोजगारांच्या ताज्या आकडेवारीने आर्थिक मंदी हटत असल्याचे स्पष्ट झाले.

सामान्य गुंतवणूकदार तसेच परदेशी कंपन्यांनी जोरदार खरेदी करून आपला आनंद साजरा केला. तब्बल त्रिशतकी निर्देशांकवाढीमुळे मुंबई शेअर बाजाराने गेल्या अडीच वर्षातील (31 महिन्यांतील) उच्चांक गाठला. तसेच निफ्टीही 5500 पुढे गेला. दोन्ही निर्देशांकात पावणेदोन टक्‍क्‍यांची भर पडली.

वेबदुनिया वर वाचा