बाजाराला मिळाली नवसंजीवनी

अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्यासह देशातील महत्त्वाचा बँक अधिकाऱ्यांनी गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी ओळीने पत्रकार परिषद घेत भारतीय बँकांवर या आर्थिक मंदीचा काडीमात्र परिणाम होणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर आज मुंबई शेअर बाजाराला जणू नवसंजीवनीच मिळाली आहे.

सुरुवातीच्या सत्रात बाजारात 450 अंशांची तर निफ्टीत 100 अंशांची वाढ झाल्याने गुंतवणूकदारांनी सुटकेचा नि:श्वास घेतला आहे.

गुरुवारी बाजारात सुरुवातीला जबरदस्त घसरण झाल्याने अर्थमंत्र्यांना यात हस्तक्षेप करावा लागला. अमेरिकी बाजारात जरी मंदीची लाट आली असली तरी भारतीय बाजारावर याचा परिणाम होणार नसल्याचे होणार नसल्याचे आश्वासन चिदंबरम यांनी गुंतवणूकदारांना काल दिले होते. यानंतर आज बाजारात पुन्हा एकदा उत्साह दिसून येत आहे.

आज बाजारात घडलेल्या घडामोडी:

आयटी इंडेक्समध्ये चांगली वाढ, टीसीएस आणि इंफोसिसच्या शेअर्स वधारले.

बँकिंग क्षेत्रात चांगला उत्साह दिसून येत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनला बँक, एचडीएफसी बँक,

आईसीआईसीआई बँक च्या शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून येत आहे.

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 450 तर निफ्टीत 100 अंशांची वाढ.

भारतीय बँका सुरक्षित-अर्थमंत्री

वेबदुनिया वर वाचा