टाटा मोटर्सच्या नफ्यात चालू आर्थिक वर्षातील सप्टेंबर महिन्यात संपलेल्या आठवड्यात दुप्पट वाढ झाल्याने नफा 729.14 कोटीवर गेला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षातील याच कालावधीत कंपनीला 346.99 कोटीचा नफा झाला होता.
कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी सी रामकृष्णन यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या उत्पन्नातही या कालावधीत वाढ झाली आहे. या महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात कंपनीच्या नफ्यात दुप्पट वाढ झाल्याने कंपनी मंदीतून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले.