LIVE: राज्यात आता सरकारी कार्यालयात मराठी बोलणे अनिवार्य
सोमवार, 3 फेब्रुवारी 2025 (21:22 IST)
Maharashtra Marathi Breaking News Live Today: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा आणि महाराष्ट्रात मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील सर्व शासकीय, निम् शासकीय आणि महापालिका कार्यालयात मराठी भाषेत बोलणे अनिवार्य असेल तसेच कार्यालयातील फलक देखील मराठीतच असावे असे बंधनकारक केले आहे राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....
मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार झाला. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी कुलीला अटक केली. सविस्तर वाचा
भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या युती असलेल्या महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे. सविस्तर वाचा
माजी ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मुंबईत क्रिकेट खेळले. त्याने त्याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. सविस्तर वाचा
मध्य प्रदेश आणि विदर्भातील जंगलातून वाघांची शिकार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या याला अटक झाल्यानंतर वाघांच्या शिकारीच्या संदर्भात नवनवीन खुलासे समोर येत आहे. सविस्तर वाचा
अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कुस्तीगीर पृथ्वीराज मोहोळ यांनी कुस्तीगीर महेंद्र गायकवाड यांचा पराभव करून महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला आहे. सविस्तर वाचा
महाराष्ट्रातील नाशिकमधून पोलिसांनी २२ जानेवारी रोजी टोळीतील पाच जणांना अटक केली. २००२ च्या गोधरा रेल्वे हत्याकांडातील दोषी सलीम उर्फ सलमान युसुफ जर्दा (५५) याला महाराष्ट्रातील पुणे येथे चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गोध्रा घटनेत दोषी ठरल्यानंतर सलीमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जामिनावर बाहेर आल्यानंतर तो फरार झाला होता. सविस्तर वाचा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका केली. शिवसेना युबीटी नेते संजय राऊत यांनीही अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. सविस्तर वाचा
आदित्य ठाकरे शिंदेंच्या शिवसेनाला देशद्रोही टोळी म्हणाले
शिंदेंची शिवसेना फुटणार का? आदित्य ठाकरेंच्या विधानामुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्या विधानामुळे महाराष्ट्रात राजकारण पुन्हा तापले आहे. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत म्हटले की, एकनाथ शिंदेंऐवजी दुसरे नेतृत्व तयार केले जात आहे.
आता सुरक्षेच्या बाबतीत मंत्रालयात मोठे बदल करण्यात आले आहे, ज्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्याचे पालन करणे बंधनकारक झाले आहे. आता मंत्रालयात प्रवेशासाठी FRS प्रणाली लागू करण्यात आली आहे. सविस्तर वाचा
महाराष्ट्रातील नागपूरमध्ये यशवंत स्टेडियममध्ये एमपी क्रीडा महोत्सवाचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या खेळाडूंना मोठी भेट दिली. सविस्तर वाचा
नागपुरातील एका खासगी शाळेतील शिक्षकाने सांस्कृतिक केंद्राच्या वॉशरूम मध्ये महिलांचे गुप्तपणे व्हिडिओ बनवल्याचा संशय एका महिला शिक्षकाला आल्याने तिने पोलिसांना ही माहिती दिली.नंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. खिडकीतून तो महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करायचा त्याच्या मोबाइलमध्ये असे अनेक व्हिडिओ सापडले आहे. सविस्तर वाचा ...
नागपुरात दोन मित्रांमध्ये एका टीशर्ट साठी 300 रुपयांसाठी झालेल्या वादामुळे एका मित्राने भावासह मित्राचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सविस्तर वाचा ....
ठाणे जिल्ह्यातील एका निवासी शाळेजवळ इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शाळेजवळच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. सविस्तर वाचा ....
महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे गावात लोकांना ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी गावातील ग्राम पंचायतने ठराव मंजूर केला आहे. बहे ग्रामसभेचे सदस्य म्हणाले, आमच्या ग्रामसभेने नुकताच एक ठराव संमत केला आहे की, भविष्यात सर्व निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्यावात. जेणे करुन संविधान आणि लोकशाहीला चालना मिळेल. सविस्तर वाचा ....
शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर एक तरुण जखमी झाला. ड्युटीवर जात असताना आरोपीने ही घटना केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आणि जखमीला रुग्णालयात दाखल केले. सविस्तर वाचा ....
शिवसेना खासदार (यूबीटी) संजय राऊत यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींच्या कुंभमेळ्याच्या संभाव्य दौऱ्यावर टीका केली आणि म्हटले की, जर दिल्लीत मतदान या प्रतीकात्मक संकेतावर आधारित असेल तर ते देशाच्या लोकशाहीला "धोका" असेल .सविस्तर वाचा ....
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. या प्रकल्पाच्या तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी सहकार विभागासोबत जवळून काम करण्याचे निर्देश पवार यांनी राज्याच्या कृषी विभागाला दिले. या बैठकीला राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, अखिल भारतीय द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष कैलास पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.सविस्तर वाचा ....
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा आणि महाराष्ट्रात मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील सर्व शासकीय, निम् शासकीय आणि महापालिका कार्यालयात मराठी भाषेत बोलणे अनिवार्य असेल तसेच कार्यालयातील फलक देखील मराठीतच असावे असे बंधनकारक केले आहे. सविस्तर वाचा ....