ग्रीस कर्जसंकटाची चाहूल; शेअर बाजार कोलमडला

मंगळवार, 30 जून 2015 (10:36 IST)
ग्रीसमधील कर्जसंकटाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबई शेअर बाजारात (सेन्सेक्स) मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये तब्बल 500 अंशांची घसरण झाली असून, राष्ट्रीय शेअर बाजारही (निफ्टी) 8,300 पातळीच्या खाली व्यवहार करत होता.
 
काल सकाळी कामकाज सुरू होताच ग्रीसमधील आर्थिक संकटाचे परिणाम शेअर बाजारात दिसून आले. सेन्सेक्स तब्बल 538.97 अंशांच्या घसरणीसह 27,272.87 पातळीवर पोहोचला. तर, निफ्टी 168 अंशांच्या घसरणीसह 8,212.90 पातळीवर पोहोचला होता. शुक्रवारीदेखील बँकिंगच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यानंतर सेन्सेक्समध्ये 84 अंशांची घसरण झाली होती व सेन्सेक्स 27,811.84 पातळीवर व्यवहार करत होता. 
 
ग्रीसमधील आर्थिक पेच अजून चिघळला आहे. युरोपियन सेंट्रल बँकेने ग्रीसमधील बँकिंग यंत्रणेला पेचातून बाहेर काढण्यासाठी अधिक निधी देण्यास नकार दिला आहे, निधी देण्यास नकार दिल्याने ग्रीसने सोमवारी सर्व बँका बंद ठेवल.

वेबदुनिया वर वाचा