आवडता कुणाचा?

शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (08:34 IST)
विवाह एक मधुर बंधन असलं, तरी त्यासोबत अनेक अधिकार, कर्तव्ये, आवडीनिवडी एकमेकांत गुंतलेल्या असतात. म्हणूनच पावलोपावली तडजोड करून या नात्यामध्ये असणारा गोडवा टिकवावा लागतो. त्यासाठी प्रसंगी स्वत:च्या इच्छा आकांक्षांकडे कानाडोळा करावा लागतो. मात्र एवढं सगळं करून देखील कधीकधी बेजबाबदारपणाचं प्रशस्तीपत्रक शेवटी मिळतेच. 
 
मुलाच्या विवाहनंतर घरी आलेल्या सुनेच्या प्रत्येक कामामध्ये चुका काढणं, तिला टोमणे मारणे, स्वत: अधिक अनुभवी असल्याचं ठामपणे सांगणं, सुनेला प्रत्येक बाबतीत हीन समजून तिला काही समजत नाही, असे सिद्ध करणे हाच जणू प्रत्येक सासूचा एकमेव उद्देश होउन जातो. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी सासू चक्क मुलालाच आधार घेते. 
 
खरं तर विवाहानंतर मुलाची संपूर्ण जबाबदारी सुनेवर पडत असल्यामुळे सुनेच्या कामात चुका कशा शोधता येतील याचाच जणू ती घेत असते. त्यामुळेच सुनेवर वर्चस्व गाजविण्याचा ती प्रयत्न करीत असते. 
 
लग्नानंतर सुनेवर नवीन जबाबदारी येऊन पडत असते. नवर्‍याबरोबच तिला घरातील इतर मंडळींची, येणार्‍याजाणार्‍याची काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत सासूने सुनेच्या प्रत्येक गोष्टीत चूक काढणे योग्य नव्हे. त्यामुळे मुलालाही कोण चूक कोर बरोबर याचा निर्णय घेणे शक्य होत नाही. म्हणूनच विवाहानंतर सासूने सुनेच्या व मुलाच्या पतीपत्नी यानात्यामध्ये हस्तक्षेप करू नये. नाहीतर जन्मभरासाठी बनलेले संबंध औटघकेचे ठरण्यास वेळ लागणार नाही. 
 
आईच्या अशा वर्तनाने मुलाच्याही मनात आईविषयी कटू भाव निर्मार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणूनच सुनेला तिच्या जबाबदार्‍या स्वतंत्रपणे ‍पार पाडण्याची मोकळीक सासू नावाच्या आईने द्यायला हवी. त्यामुळे मुलाच्या मनात आईबद्दल कटूभाव आणि सुनेच्या मनात द्वेष निर्माण न होता एक निर्मळ नांत अधिक घट्ट होण्यास मदत होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती