दांपत्य जीवनात लहान-सहान वाद, भांडण सामान्य बाब आहे तरी वाद घालताना शब्दांची निवड करताना अलर्ट असलं पाहिजे. कारण आपण रागाच्या भरात बोलत असाल तरी एक शब्द पतीच्या मनाला दुखावू शकतं आणि याने आपल्या नात्याचं भविष्य बिघडू शकतं. कारण वाद मिटला तरी अनेकदा त्या दरम्यान आपण बोलून गेलेले शब्द पतीच्या मनातून काही निघत नाही. अशात जाणून घेणे आवश्यक आहे की आपल्या कोणत्या गोष्टी त्यांच्या मनाला वेदना देऊ शकतात-
कामावर आणि व्यस्ततेवर थट्टा
ऑफिस किंवा व्यवसायात गुंतलेल्या लोकांना नेहमीच हे ऐकावं लागतं की कुटुंबासाठी वेळ नाही. परंतू कार्यक्षमतेवर थट्टा करणे महागात पडू शकतं.