96) वाढदिवस असेल इतर काही कार्यक्रम असेल तर भेटवस्तू आणून ठेवणे त्यानुसार फोन करणे,
97) स्वतःच्या, घरातल्या व्यक्तींच्या रेग्युलर टेस्ट्स, चेकअप करून घेणे,
4) अति गृहकृत्यदक्ष विभाग :
98) दूध फ्रीजमध्ये ठेवणे,
99) दही लावणे,
100) साय जमवणे,
101) लोणी काढणे,
102) तूप घरी कढवणे,
103) राहिलेल्या बेरीचे नानाविध प्रकार करणे,
104) वाळवणाचे पदार्थ करणे,
105) फळांचे ज्यूस, शेक, इतर सुप्स नियमित घरी करणे,
106) नवीन पदार्थ, केक, बिस्किटे, पाव घरी करणे,
107) घरात कायम चिवडा, लाडू करणे,
108) सिझनल फुलं, झाडे नर्सरीतून मागवणे,
5) अधिक विचार करुन सुचलेली कामे :
109) देवपूजा करणे,
110) एखादे व्रत, त्याची तयारी, सणवार साजरे करण्याची तयारी,
111) कपड्यांची डागडुजी, बटण लावणे, उसवलेले शिवणे,
112) मुलांचा अभ्यास घेणे,
113) प्रोजेक्ट बनवणे, मुलांचा गृहपाठ घेणे व करणे,
114) नवरा बिघडू नये म्हणून त्याला धाकात ठेवणे.
115) ऐनवेळी सुचलेली कामे करणे.....!!
लिहिल्यापासून अनेकदा ही लिस्ट अपडेट केली आहे. तरीही लिस्ट अपूर्णच आहे. अजून नोकरी करणाऱ्या, लहान मुले असणाऱ्या, अशा विविध वयोगटानुसार वाढणारी कामे यात अंतर्भूत नाहीतच.....!
लिहीता लिहीता खालील श्लोक मनात आला.....
असित गिरि समं स्यात् कज्जलम् सिन्धु पात्रे ।
सुरतरुवर शाखा लेखनी पत्रम् उर्वी ॥
लिखति यदि गृहित्वा शारदा सर्वकालं ।
तदपि तव गुणानां ईश पारं न याति ॥
समुद्राची शाई करून जरी लिहायचे ठरवले तर तीही कमी पडावी असं जर गृहकृत्यदक्ष गृहिणी बद्दल म्हटले तर त्यात काही वावगे वाटून घेऊ नये.....!
स्त्री, गृहिणी, गृहकृत्यदक्ष, शेयरिंग आणि केअरिंग एवढ म्हटल म्हणजे नाही संपल. पुरुषमंडळींनी अंतर्मुख होऊन विचार करावा की यातली किती कामे ते पूर्णपणे व किती कामे संयुक्तपणे करतात.....?