नातं घट्ट करण्यासाठी काही यशस्वी मंत्र अवलंबवून बघा
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (16:50 IST)
नातं चांगलं बनवून ठेवणे आणि त्याला टिकवून ठेवणे काही अवघड काम नाही. काही छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेऊन आपण आपल्या नात्याला अधिक दृढ आणि यशस्वी करू शकता. आज आम्ही आपल्याला काही अशा टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपण नातं अधिक बळकट करू शकता आणि ह्याची सुरुवात आपल्याला नवीन नात्यात गुंतण्यापूर्वीच करावयाची आहे.चला तर मग जाणून घेऊ या काय आहे त्या टिप्स.
1 या जगात कोणी ही परिपूर्ण नाही म्हणून आपण आपल्या जोडीदाराकडून देखील परिपूर्णतेची अपेक्षा करू नका.लक्षात ठेवा की आपण जोडीदाराला त्याच्या कमतरतेसह स्वीकारले आहे आणि हेच खरं प्रेम आहे.
2 हे खरं आहे की लग्नानंतर देखील आपलं स्वतःचा आयुष्य आहे, काही निर्णय स्वतःचे असतात, तरीही काही असे निर्णय ज्यांचा प्रभाव दोघांवर पडतो , एकटे घेऊ नका. जसे की नोकरीत बदल,कर्ज घेणं किंवा एखाद्या मोठ्या वस्तूची खरेदी करणं - या सर्व निर्णयामध्ये आपल्या जोडीदाराला देखील समाविष्ट करा.
3 लग्नानंतर एकमेकांना बदलण्याची घाई अजिबात करू नका. असा विचार देखील करू नका की आता आपल्या जोडीदाराने आपल्या म्हणण्यानुसार चालले पाहिजे.असं केल्याने भांडणे होऊ शकतात.एकमेकांना चांगल्या वाईट सवयी सह स्वीकारा.
4 जर आपण जोडीदारामध्ये काही बदल इच्छिता जे त्यांच्या हितासाठी आहे तर त्याची सुरुवात टीका करून करू नका.त्यांना खूप प्रेमाने समजावून सांगा. एकाच रात्री बदल होईल असं काही शक्य नाही.
5 लहान लहान आनंद देखील सामायिक करायला शिका. मग तो पावसात भिजण्याचा असो किंवा मावळत्या दिनकराला बघणे असो. ह्यामध्ये देखील एक विशेष आनंद दडलेला आहे. कोणत्या मोठ्या आनंदाची वाट बघत बसू नका. आयुष्याचा पुरेपूर आनंद घ्या.
6 नात्यात संवादाचे अंतर आणू नका. अबोला हा नात्यातील मोठा शत्रू आहे. प्रत्येक परिस्थितीत संवाद सुरू ठेवा. आपल्या जोडीदाराला मनाचे सर्व सांगा. आपल्या सर्व भावना त्यांच्याशी सामायिक करा. त्यांची एखादी गोष्ट आवडली की त्याचे भरभरून कौतुक करा.
7 वेळेचे रडगाणे गाऊ नका. जर आपल्याला असं वाटत आहे की आपल्या व्यस्त दिनचर्येमुळे नात्यांवर परिणाम होत आहे. तर या वर त्वरित काही तोडगा काढा आणि नात्यात वेळ देण्याचा प्रयत्न करा.
8 ज्या गोष्टींमध्ये मतभेद होतात. किंवा ज्या गोष्टींमध्ये वैचारिक भिन्नता आहे त्या गोष्टींना पूर्ण करण्याचा अट्टहास करू नका. असं केल्याने नात्यात ताण येतो.
9 आपण आपले विचार, भावना मोकळे पणाने एकमेकांशी सामायिक करा,परंतु हे लक्षात ठेवा की सामायिक करण्याच्या नावाखाली केवळ तक्रारच करत बसू नका. असं केल्यानं नात्यात कटुता आणि संताप वाढतो.
10 नेहमी मोबाईल,टीव्ही, लॅपटॉप किंवा सोशल नेटवर्किंग साईट वर व्यस्त राहू नका, ऑफिस आणि मित्रांपायी परिवाराला दुर्लक्षित करू नका.असं केल्यानं नात्यात दुरावा येतो.