पावसाळ्यात बहरतो सोनटक्का अर्थात कर्दळी!

शनिवार, 16 जुलै 2022 (22:27 IST)
घरी लावल्या जाणार्‍या या झाडांमध्ये गुलाब, मोगरा, जास्वंदल यानंतर कुठल्या फुलांचा नंबर लागत असेल? तर तो सोनटक्का आणि ब्रह्मकमळाचा. दोन्ही झाडांना ऐन पावसा्यात बहर येतो. व्यवस्थित देखभाल आणि पाणी गालणं सुरू असेल तर हिवाळ्यातही फुलं येतात. सोनटक्क्याचा कंद एकदा रुजला आणि त्याला फांद्या यायला लागल्या की, तुम्ही निश्चित राहू शकता. इतर झाडांपेक्षा या झाडाला पाणी अधिक लागतं. म्हणून नियमितपणे पाणी घालणं गरजेचं आहे. तसंच या झाडाच्या वाढीला पोषक म्हणून भाजीपाल्याचा कचरा घाला, फुलांचे वापरून झालेले भाग घाला. त्याशिवाय आठवड्यात एकदा फ्लॉवर, कोबीची पानं देठ बारीक तुकडे करून घालावीत. जेव्हा जमेल तेव्हा बटाट्याची सालं घाला. मग बघा सोनटक्का तुम्हाला किती फुले देतो ते!
 
याला खरा बहर येतो तो पावसाळ्यात. त्यावेळी एका फांदीपासून तुम्ही सहा ते अगदी बारापर्यंत फुलंही मिळवू शकता. एकदा का फुलं यायला सुरुवात झाली की, फुलं सतत रोजच्या रोज येतच राहतात. व्य‍वस्थित देखभाल आणि पाणी घालणं सुरू असेल तर हिवाळ्यातही फुलं येतात. त्यावेळी तुलनेने फुलांची सख्या मात्र कमी होते. याला येणारी फुलं ऑगस्ट, सप्टेंबर या पावसाळी महिन्यातच असतात. जेवढी पानाला विस्तारायला बाल्कनीत जागा मिळे, तेवढे पानांचे फुटवे वाढतात. त्यानुसार कळ्या, फुलं येण्याची शक्यता वाढते. याला थोडा उग्र वास असतो. तरीही तो आल्हाददायक असतो. रात्री फूल उमलायला सुरुवात होते आणि मध्यरात्री ते फूल पूर्ण उमलतं. दुसर्‍या दिवशी सकाळी के कोमेजलं असतं. पावसाळ्यात फुलं देणारं झाड एकदा फसलं होतं. असा बहर येऊन गेल्यावर छाटणी केल्यास पुढील वाढ चांगली होते. तसंच कोणत्याही पानाची वाढ योग्य नसेल तरीही ते छाटून टाकणं हे श्रेयस्कर! अर्थात,वर्षभर झाडाची योग्य निगा राखणं तितकचं महत्वाचं आहे. तरच तुम्हाला ऑगस्ट,सप्टेंबरमध्ये ही फुलं मिळू शकतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती