मासिक पाळी अनियमित होण्यामागील कारण, दुर्लक्ष करू नका

शनिवार, 25 एप्रिल 2020 (15:14 IST)
स्त्रियांमध्ये मासिक पाळीची कालावधी नियमित असणे चांगलेच असते. हे चांगल्या आरोग्याचे सूचक असते. जर ते उशीरा किंवा अनियमित असतील तर यामागची अनेक कारणे असू शकतात. जास्त वजन वाढणे देखील पाळीच्या उशीरा येण्याचे कारण असू शकते. या व्यतिरिक्त, इतर कारणं कोणते असू शकतात जाणून घेऊ या..
 
1 कमी किंवा जास्त वयामध्ये मासिक पाळी सुरु होणे देखील अनियमितता असू शकते. ही एक सामान्य गोष्ट असू शकते. कालांतराने हे नियमित होऊ शकते, काळजी करावयाचे काहीच कारणं नाही.
 
2 जास्त वजन किंवा लठ्ठपणा देखील मासिक पाळीच्या अनियमिततेचे प्रमुख कारणे असू शकतात. कधी कधी ही समस्या थायराइडच्या आजारामुळेसुद्धा उध्दभवते. त्यासाठी वैद्यकीय परामर्श घेणे आवश्यक असतं.
 
3 आपल्या रोजच्या दैनंदिनीमुळे आणि बऱ्याच वेळा खाण्याचा पिण्याच्या चुकीच्या सवयी मुळे देखील मासिक पाळी अनियमित किंवा उशीरा येते. अश्या परिस्थितीत आपणं आपली जीवनशैली आणि आहाराला नियमित करू शकता.
 
4 पॉलिसिस्टिक अंडाशय सिंड्रोम मासिक पाळी उशीरा येण्याचे एक गंभीर कारणं असू शकतं म्हणून जर का वरील दिलेल्या कारणां व्यतिरिक्त अन्य काही घडत असल्यास त्याची चौकशी केली पाहिजे.
 
5 जास्त ताण आणि जास्त व्यायाम करणे सुद्धा मासिक पाळीच्या अनियमिततांचे कारणं असू शकतं. अंडाशयावर आवरणं(सिस्ट) बनल्यामुळे सुद्धा मासिक पाळीची अनियमितता असू शकते.
यापैकी लक्षणं ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती