मुलांचे संगोपन करताना या गोष्टी लक्षात ठेवा

शनिवार, 27 मार्च 2021 (22:01 IST)
जेव्हा पती-पत्नी पालक बनतात, तेव्हा त्यांच्यासाठी तो आयुष्यातील सर्वात मोठा दिवस असतो. मुलं घरी आल्यावर त्यांची खरी परीक्षा सुरु होते. मुलांच्या संगोपनाची  जवाबदारी दोघांवर असते. मुलांच्या संगोपनास काही अडचणींना सामोरी जावे लागते. मुलांचे संगोपन करताना या गोष्टी लक्षात ठेवा. 
 
1 मुलांना समजावून सांगा - मुलांवर आपले मत लादू नका . त्यांना समजावून सांगा. की काय त्यांच्यासाठी चांगले आहे आणि काय वाईट आहे. मुलांना समजावून सांगितल्यावर त्यांना गोष्टी लवकर समजतील.  
 
२ मुलांना पूर्ण वेळ द्या- आपण मुलांसाठी थोडावेळ तरी काढावे. काही पालक कामाच्या व्यस्ततेमुळे आपल्या मुलांना अधिक वेळ देऊ शकत नाही. असे करू नका. आपण त्यांना वेळ दिल्यावर त्यांना आपल्याबद्दल प्रेम आणि आपुलकी वाटेल तो आपल्याशी सर्व काही सामायिक करेल.
 
3 रागावू नका- कोणत्याही समस्येचे समाधान रागावून किंवा चिडून होत नाही. असं केल्याने मुलं देखील चिडचिड आणि रागराग करतात. आपण त्याच्या मनाचे काही केले नाही तर ते देखील चिडतात. त्यांना समजावून सांगा की कोणत्या कारणास्तव आपण नकार देत आहात. असं केल्याने त्यांना लवकर समजेल. 
 
4 त्यांचे मित्र किंवा मैत्रीण बना- वयात येणाऱ्या मुलांसह मित्र किंवा मैत्रिणी प्रमाणे वागा .जेणे करून ते आपल्यासह सर्व गोष्टी विश्वासाने सामायिक करतील.     
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती