घराच्या सौख्यासाठी होलिका दहन च्या दिवशी हे काम करणे टाळा

रविवार, 28 मार्च 2021 (09:30 IST)
होलिका दहन हा हिंदूंचा मोठा सण आहे. घराच्या शांती साठी या दिवशी हे काम करू नका. 
 
1 मांसाहार करू नका- 
या दिवशी होलिकाची पूजा केली जाते आणि घरात नेहमी सुख आणि समाधान नांदो याची इच्छा केली जाते. म्हणून या दिवशी चुकून देखील मांस आणि मद्यपान चे सेवन करू नये. अन्यथा घरात आजारपण आणि धन हानी संभवते. 
 
2 कोणालाही पैसे उसने देऊ नये- 
कोणाला ही कितीही पैशाची गरज असेल तरीही आपण पैसे उसने देऊ नये. असं केल्याने घरात धनहानी संभवते.
 
3 वडीलधाऱ्यांचा अपमान करू नका- 
घरातील वडीलधारी नेहमी चांगले करण्याचा सल्ला देतात. म्हणून त्यांना नेहमी सन्मान द्यावा. होलिका दहनाच्या दिवशी वडीलधाऱ्यांचा अपमान करू नका,अन्यथा घरात रोगराही पसरते. या दिवशी वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा.
 
4 कोणाच्या घरी जेवू नये- 
या दिवशी दुसऱ्यांकडे जेवण करणे टाळावे. असं केल्याने घरात रोग येतात. या दिवशी कुटुंबासमवेत जेवण करावे आणि देवाला गोडधोडाचा नैवेद्य दाखवावा. 
 
5 मोकळे केस ठेवू नये- 
 असं म्हणतात की या दिवशी पौर्णिमा असल्याने नकारात्मक शक्ती फिरत असते. म्हणून स्त्रियांनी मोकळे केस घेऊन फिरू नये. घरात नकारात्मक शक्तींचा वास होतो.
 
6 घरात वाद करू नये- 
या दिवशी घरात वाद विवाद आणि भांडणे करू नये. या मुळे घरात अशांतता येते. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती