करिअरची निवड करताना या गोष्टी लक्षात ठेवा

गुरूवार, 25 मार्च 2021 (08:00 IST)
आपल्या करिअरची निवड करणे हा एक मोठा निर्णय असतो, या वर आपले अवघे भविष्य निर्भर असते. बऱ्याच वेळा करिअरची निवड करताना आपण काही गोष्टींना दुर्लक्षित करतो या मुळे त्याचा परिणाम आयुष्यभर सहन करावा लागतो .आपल्याला देखील अशा परिस्थिती मधून जावे लागत असेल तर या साठी आम्ही काही टिप्स सांगत आहोत,ज्यांना अवलंबवून आपण करिअरची योग्य  निवड करू शकाल.
 
* बरोबरी करू नका- बऱ्याच वेळा आपण आपल्या भोवती काही यशस्वी लोकांना बघतो आणि आपल्याला असे वाटते की त्या क्षेत्रात तर सहज यश मिळू शकेल आणि आपण त्या क्षेत्राची निवड करतो. परंतु असे आवश्यक नाही की ते क्षेत्र आपल्यासाठी बनले आहे. काम असे करा जे केल्याने आपल्याला आनंद आणि समाधान मिळेल. 
 
* गरज समजा - बऱ्याच वेळा काही कामे असे असतात की ज्यांचे वेळ वेगळे स्वरूप असतात .आपण आपली गरज बघून कामाचे स्वरूप निवडा. जेणे करून आपण ते काम सहजरित्या पूर्ण करू शकाल आपली आवड ज्या क्षेत्रात आहे त्यानुसार करिअरची निवड करा. 
 
* सल्ला घ्या- आपल्या समोर करिअरची निवड करण्याचे बरेच मार्ग आहे,परंतु आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचे आहे हे समजत नाही तर आपण एखाद्या योग्य करिअर काउंसलरचा सल्ला देखील घेऊ शकता. ते आपल्याला उचित समुपदेशन करतील जेणे करूंन आपल्याला करिअरची निवड करण्यात काहीच अडचण येणार नाही. 
 
*  नवीन आव्हाने - आपल्याला असे वाटत आहे की कामात नेहमी आनंद वाटावे यासाठी आपण नवीन आव्हाने स्वीकारा.एकाच स्वरूपाचे काम करून काही दिवसांतच कंटाळा येतो, आपण विचार करतो की या ऐवजी आपण इतर कोणत्या करिअरची निवड केली असती तर बरे झाले असते. दररोज काही नवीन करण्याची आवड ठेवा. या मुळे आपला उत्साह वाढेल.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती