फॉर्मल मिटिंगमध्ये नेटकं चालणं-बोलणं

फॉर्मल मिटिंग असो किंवा इंटरव्ह्यू, तुम्हाला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं जातं, त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व खुलवणं गरजेचं आहे. कसं बसायचं, कसं उठायचं हे सगळं जाणून घ्यायला हवं. चला वर्क एटिकेट्‍सबद्दल जाणून घेऊ.
 
* तुम्ही असे उठता, बसता आणि उभं राहता याकडे लक्ष द्या. खांदे पाडून उभं राहू नका. ताठ उभं रहा. पाठीत वाकू नका. पाय जळवून उभं रहा. पोट आत घ्या. आता सरळ ठेवा. यामुळे तुमचा आत्मविश्वास दिसतो. 
 
* पायांवर पाय ठेऊन बसणं आपल्याकडे चांगलं मानलं जात नाही. त्यामुळे पाय खाली ठेऊन बसा. 
 
* फॉर्मल मिटिंग किंवा कुणालाही भेटताना हस्तांदोलन केलं जातं. त्यामुळे तुमचे हात आणि नखं स्वच्छ असू द्या. अस्वच्छ नखांमुळे तुमची प्रतिमा डागाळू शकते. त्यामुळे काळजी घ्या. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती