रिठ्याचे औषधी गुणधर्म

* अंगाचा दाह होत असल्यास रिठ्याचा फेस अंगाला चोळल्याने आराम वाटतो. 


 
पोटात कृमी झाल्याने लहान मुलांचे पोट सतत दुखत राहते. अशा वेळी पाव ग्रॅम रिठ्याचे टरफल गुळातून घाटवल्यास कृमी पडून जातात.
कफ चिकटून राहत असल्यास तोंडात रिठा धरून थोडा थोडा सा गिळत राहिल्यास कफ पातळ होतो आणि पडून जातो.

* मनुष्य फेफरे येऊन पडल्यास रिठे उकळवलेले पाणी नाकात सोडणे हा उत्तम उपाय आहे.
 
कोणत्याही प्रकाराचे विष पोटात गेले तर रिठ्याचे पाणी प्यायला द्यावे. यामुळे उलटी होते आणि विष उतरते.

मसालायुक्त शिकेकाई करताना रिठे वापरले जातात. त्यामुळे नैसर्गिक कंडिशनरचे काम होते.


 
 

* रिठे भिजत घालून त्या पाण्यात सोन्याचे अथवा चांदीचे दागिने भिजवून ठेवल्यास चिकटलेला मळ निघून दागिना स्वच्छ व चमकदार होतो.




 
रिठे पाण्यात भिजवून ते चांगले कुस्करून पाणी अंगाला चोळल्यास अंगावर पित्त उठण्याचा त्रास कमी होतो.
 
अकस्मात मूत्र कोडले असता खाकरेची बी आणि रिठ्याची बी पाण्यात उगाळून ओटीपोटाच्या सभोवती लेप लावावा आणि शेक द्यावा. यामुळे लघवी साफ होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती