हिंग केवळ पदार्थांचा स्वाद वाढत नसून त्याचे अनेक फायदे आहेत. पाहू त्यातून 7 अद्वितीय फायदे:
* वरणा-भाजीला हिंगाची फोडणी देण्याने पोटासंबंधी होणार्या रोगांची शक्यता कमी होते. पचन कमजोर असल्यास याच्या चूर्णाचे सेवन फायदेशीर ठरेल. पोटात गॅस असल्यास ताकाबरोबर हिंग घेतल्याने आराम पडतो.
* उचकी थांबत नसल्यास हिंग खाणे फायदेशीर ठरेल. अधिक ढेकर किंवा मळमळ होत असेल तर मॅश केलेल्या केळात चिमूटभर हिंग टाकून सेवन करावे. आराम पडेल.
* छातीत कफ जमल्यास हिंगाचे लोशन लावल्याने फायदा होईल. यासाठी पाण्यात हिंग घोळून लेप तयार करावे. हे लावल्याने कफ विरघळून बाहेर पडेल.
* जर आपल्या कमी ऐकायला येत असेल तर बकरीच्या दुधात हिंग घासून कानात 2 थेंब टाका आणि कापसाचा गोळा लावून झोपून जा. सकाळी उठून कान स्वच्छ करा. काही दिवस ही प्रक्रिया केल्याने स्पष्ट ऐकायला येईल.
* टाचांना भेगा पडत असल्यास, कडुनिंबाच्या तेलात हिंग मिसळून लावावे.
* डाग किंवा त्वचा संबंधी तक्रार असल्यास हिंग पाण्यात घोळून त्याजागेवर लावावे.