सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत शारीरिक हालचालींचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लहान वयातच शारीरिक दुखणी मागे लागतात. पाठदुखी, कंबरदुखी अशा प्रकारचे आजार सुरू होतात. या आजारांवर आता घरगुती उपाय करून ते बरे होऊ शकतात. ते कसे..?
रोज कमीत कमी वीस ते पंचवीस उठाबशा काढाव्या. त्यामुळे कंबरेचा घेर वाढत नाही.
जमिनीवर पालथे झोपून पाय एकमेकांना चिकटून ठेवावे. हात खालीच सरळ रेषेत ठेवावे. हळूहळू फक्त कंबरेचा भाग वर उचलावा व खाली करावा. ही क्रिया म्हणजेच अशा प्रकारचा व्यायाम केल्यासही कंबरदुखी थांबते.
हा व्यायाम तुम्हाला नियमित करावा लागेल.
तसेच दुसरी पद्धत म्हणजे पाठीवर झोपावे आणि दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून वर उचलावे. पायांना हाताचा आधार देत एकदा डाव्या कुशीवर तर एकदा उजव्या कुशीवर वळावे. यामुळेही कंबरेचा घेर आटोपशीर राहतो.
जमिनीवर पाय फाकवून उभे राहावे. एकदा संपूर्ण शरीर उजवीकडे वळवावे तर काही वेळ त्या स्थितीत राहून नंतर डावीकडे शरीर वळवावे. हा व्यायाम हातात बॉल घेऊनही करता येतो. दोन व्यक्तीनी एकमेकांकडे पाठ करून वळून परस्परांकडे बॉल पास करण्याचा प्रयत्न केल्यास आपोआप हा व्यायाम होतो. त्यामुळेही कंबर सडपातळ राहते.