पावसाळ्यात कशी घ्याल गॅझेटसची काळजी !

शुक्रवार, 29 जुलै 2022 (22:03 IST)
आपले गॅझेटस पावसात भिजू नयेत यासाठी आपण फारशी काळजी घेताना दिसत नाही. आपले गॅझेट पावसात भिजू नये यासाठी आपण काय करावे? तसेच ते भिजल्यावर काय उपाययोजना करू शकतो याबाबत आपण जाऊन घेऊयात. :
 
 पावसात मोबाइलला सर्वात जास्त सांभाळावे लागते. कारण मोबाइल आपल्या बरोबर असतो. पावसाळ्यात मोबाइलसाठी एक प्लास्टिकची पिशवी किंवा प्लास्टिकचे पाऊच आवर्जून ठेवावे. शक्यतो आपल्या पँटच्या खिशात मोबाइल ठेवू नका. पाऊस पडत असेल त्यावेळेस तो आपल्या बॅगमध्ये ठेवणेच पसंत करा. पाऊस पडत असताना जर मोबाइलवर बोलायचे असेल तर हेडफोंसचा वापर करा. मोबाइल बाहेर काढू नका. 
 
लॅपटॉप हा नियमित त्याच्या बॅगमध्येच ठेवा. त्यासाठीही प्लास्टिक पिशवीचा वापर केल्यास उत्तम राहील. एवढी काळजी घेऊनही लॅपटॉप असो, मोबाइला किंवा महागडा कॅमरा जर तो भिजला तर पहिली गोष्ट करा की, तुमचं गॅझेट बंद करा. त्यामुळे विद्युतप्रवाह आतल्या साकटपर्यंत पोहचणार नाही. आणि बरंचसं नुकसान टळेल. तुमच्या गॅझेटचे भाग सुटे होत असतील तर आधी ते सुटे करून घ्या. मेमरी कार्ड, सिम कार्ड, मागचं पॅनल इ. आता हे सुटे भाग सुक्या, स्वच्छ व मऊ कपड्यावर मोकळ्या जागेत ठेवा. 
 
गॅझेटच्यावरचं पाणी साफ केलं पण आतल्या पाण्याचं काय? तुमचा मोबाइल किंवा कॅमेरा जोरात हलवा. त्यातील जास्तीत जास्त पाणी बाहेर काढायचा प्रयत्न करा. यानंतर टॉवेल, टिश्यू किंवा वर्तमानपत्राचा कागद घेऊन तुमचं गॅझेट काळजीपूर्वक पुसून घ्या.
 
एखादी वस्तू पाण्यात पडल्यावर किंवा भिजल्यावर आपण ड्रायर किंवा ब्लोअरचा वापर करतो. पण गॅझेटच्या बाबतीत असं अजिबात करू नका. गरम हवा गॅझेटसाठी चांगली नसते. याहूनही वेगळी अशी एक ट्रिक म्हणने चक्क तांदळाचा वापर करा. तांदळात गॅझेट पुरून ठेवा. एका भांड्यात स्वच्छ निवडलेले तांदूळ घ्या. तुमचं गॅझेट त्या तांदळात पुरून ठेवा. भांड्यावर झाकण लावून बंद करा. या ट्रिकने पूर्ण भिजलेल्या मोबाईलला कोरडं होण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे. पण तुमच्या गॅझेटची परिस्थिती याहून ओलावा शोषून घेतो.
 
तांदळामधून बाहेर काढताच लगेचच मोबाइल चालू करण्याची घाई करून नका. तुमच्याकडे अल्कोहोल स्पिरीट असेल तर कापसाचा बोळा त्यात अतिरिक्त पाण्याचं बाष्पीभवन होईल व गॅझेट लवकरात लवकर कोरडं होईल. गॅझेट पूर्ण कोरडं झालं याची खात्री पटल्यावर मगच ते सुरू करा. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती