कमी वेळात आणि कमी मेहनत घेऊन प्रेस करण्यासाठी हे आहेत काही उपाय-
एक स्वच्छ टॉवेल घ्या. त्याला पाण्यात बुडवा आणि नंतर त्यातील पाणी काढून टाका. नंतर प्रेस करण्यासाठी कपड्याला गुंडाळून घ्या आणि प्रेस करा. यामुळे तुमच्या ड्रेसवरील सुरकुत्या की होतील आणि प्रेस होऊन जाईल. स्प्रे केल्यानंतर जसे कपडे योग्य पद्धतीने प्रेस होतील तसेच टॉवेलध्ये गुंडाळल्यावर होऊन जातील.
कपड्यांना ड्रायरमध्ये सुकविणे हा सुद्धा कपडे प्रेस करण्याचा उपाय आहे. स्लो स्पिनवर लावल्याने कपड्यांवरच सुरकुत्या कमी होतात. कपडे धुतल्यानंतर योग्य पद्धतीने ठेवणेही गरजेचे आहे. कसेही वेडेवाकडे तसेच कपडे पडू दिले तर कपड्यांवर अधिक सुरकुत्या पडतात. कपडे धुतल्यानंतर जेव्हा ते वाळत घालताना जसेच्या तसे टाकू नका. कपडे नीट झटकून घ्या.