गरोदरपणात प्रत्येक स्त्री या 5 आरोग्याच्या तक्रारींना सामोरी जाते

सोमवार, 28 डिसेंबर 2020 (17:06 IST)
गरोदरपणात हार्मोन्सच्या बदलमुळे प्रत्येक महिलेला मार्निंग सिकनेस, मूड स्विंग, केसांची गळती, या सारख्या त्रासांना सामोरी जावे लागत आहे. याच वेळी जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे गर्भलिंग मधुमेह, यू टी आय सारख्या समस्या होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत प्रत्येक महिलेला या पासून बचाव करण्याचे टिप्स माहिती असायला पाहिजे. चला तर मग आम्ही सांगत आहोत गरोदरपणात होणाऱ्या या 5 सामान्य त्रासाच्या माहिती बद्दल आणि त्या पासून बचाव करण्याचे काही उपाय 
 
1 मधुमेह -
गरोदरपणात बायकांमध्ये जेस्टेशनल डायबिटीज किंवा गर्भलिंग मधुमेह होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे जन्मलेल्या बाळामध्ये काही जन्मजात आजार होण्याचा धोका असतो. 
संरक्षणासाठी काय करावे ?
ज्या बायका पूर्वी पासून मधुमेहाच्या रुग्ण आहे त्यांनी बटाटे, भात, जँकफूड, गोड पदार्थांपासून दूर राहावं आणि दर महिन्यात OGTT (ओरल, ग्लूकोज, टॉलरन्स टेस्ट) करवावी. या सह मधुमेह नियंत्रित करण्यासाठी डॉक्टर औषधे किंवा इन्सुलिन इंजेक्शन घेण्याचा सल्ला देखील देतात.
 
2 यूटीआय -
शरीरात प्रोजेस्टरॉनचे प्रमाण वाढल्यामुळे बायकांना या वेळी यूटीआय संसर्गाचा धोका वाढतो, या मुळे किडनीच्या संसर्गाचा धोका वाढतो. द्रव्य पदार्थ जास्तीत जास्त घ्यावे. योग्य आहार घ्यावा. जंक फूड, स्ट्रीट फूड खाणे टाळावे आणि अस्वच्छ असलेल्या टॉयलेटचा वापर करू नये.
 
3 प्री एक्लेमप्सिया - 
सुरुवातीच्या 20 व्या आठवड्यात काही बायकांचा बीपी वाढतो, ज्यामुळे लघवीच्या वाटे प्रथिने निघून जातात. ह्याला प्री-एक्लेमप्सिया असे म्हटले जाते, जे फार गंभीर आहे. या मुळे चेहऱ्यावर सूज येणं, पाय दुखणे, रक्ताभिसरणामध्ये अडथळा होणं आणि बाळाच्या वाढीस अडथळा निर्माण होतो. अशा परिस्थितीत बायकांनी नियमित तपासणी करवावी आणि काहीही त्रास आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा. 

4 पाय आणि कंबर दुखी -
गरोदरपणात होणारे पाय, कंबर, मणक्याचे हाड, स्नायूंमध्ये वेदना, सूज आणि ताण येण्यामुळे उठणे-बसणे कठीण होतं. हे टाळण्यासाठी अधिक विश्रांती घ्यावी आणि अवजड सामान उचलणे टाळावे. या सह झोपण्याची स्थिती देखील योग्य असावी.
 
5 अशक्तपणा -
अशक्तपणा म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता. हे बाळाच्या वाढीस अडथळाच आणत नाही तर गर्भपाताला देखील कारणीभूत असू शकतो. अशा परिस्थितीत आपल्या आहारामध्ये डाळिंबं, बीट, हिरव्या पालेभाज्या, अंजीर, खजूर सारखे आयरनयुक्त पदार्थ समाविष्ट करायला पाहिजे जेणे करून शरीरात रक्ताची कमतरता होऊ नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती