गरोदर बायकांनी हिवाळ्यात अशी काळजी घ्यावी

शुक्रवार, 4 डिसेंबर 2020 (09:32 IST)
हिवाळ्याच्या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचे असते. जेणे करून आजारांपासून लांब राहता येते. त्याच वेळी जर आपण गरोदर असाल तर आपल्याला अधिक काळजी घेण्याची गरज असते. कारण या परिस्थितीत काळजी निव्वळ आपलीच नाही तर येणाऱ्या बाळाची देखील असते. त्या मुळे आपल्याला दुपटीने काळजी घ्यावयाची आहे. हिवाळ्यात योग्य आहार आणि काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊ या की हिवाळ्याच्या काळात कोणती काळजी घ्यावयाची आहे. 
 
* हिवाळ्याच्या काळात स्वतःला सक्रिय ठेवण्यासाठी गरोदर महिलांनी योगा करायला पाहिजे पण लक्षात असू द्या की एखाद्या तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसारच योगाचा आपल्या नित्यक्रमात समावेश करावा.
 
* गरोदर महिलांना सर्दी पासून संरक्षण आवश्यक आहे. म्हणून उबदार कपडे घाला. जेणे करून आपण थंडी पासून वाचू शकाल. कारण गर्भात वाढणाऱ्या बाळांवर बाहेरच्या हवामानाचे परिणाम होते, म्हणून आपल्याला स्वतःची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावयाची आहे. पायात मोजे घाला. घरात देखील चपला वापरा.
 
* आरोग्यासाठी पौष्टिक आहार घेणं खूप आवश्यक असते. हिवाळ्यात रोग प्रतिकारक शक्ती बळकट राहण्यासाठी आपल्या आहाराची काळजी घ्या. 

* हिवाळ्यात गरोदर महिलांची त्वचा खूप कोरडी होते या पासून मुक्त होण्यासाठी चांगल्या प्रतीचे मॉइश्चरायझर लावा.या शिवाय आपण बेबी ऑइल देखील वापरू शकता.आंघोळ केल्यावर आपल्या संपूर्ण शरीरावर बेबी ऑइल ने हळुवार हातांनी मॉलिश करून उबदार कपडे घाला.  
 
* हिवाळ्याच्या काळात आपल्याला सर्दी,पडसं, ताप सारखी समस्या असल्यास, त्वरितच डॉक्टरांशी संपर्क साधा.स्वतःच्या मनाने कोणत्याही गोष्टींचे सेवन करू नका. या साठी चिकित्सकांचा सल्ला आवर्जून घ्यावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती