Brass Utensils Cleaning Tips : आपण स्वयंपाकघरात पितळेची भांडी क्वचितच वापरत असलो, तरी प्रत्येक घरात पितळेची योग्य भांडी मोजकीच असतात. विशेषत: पूजेसाठी आजही आपण पितळेची भांडी वापरतो कारण ती शुद्ध मानली जातात. ही पितळेची भांडी साफ करणे फार कठीण आहे, विशेषत: एकदा काळी झाली की पुन्हा चमकणे फार कठीण होते.पितळ्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी स्वयंपाकघरात असलेल्या वस्तूंमधून पितळेची भांडी पूर्णपणे चकचकीत बनवू शकता.चला तर मग जाणून घेऊ या.
1 लिंबू आणि मीठ-
एक चमचे मीठ आणि दोन चमचे लिंबाचा रस एकत्र मिक्स करून पितळेच्या भांड्यांवर लावा आणि काही वेळ भांडी नीट घासून घ्या, नंतर कोमट पाण्याने धुवा, पितळेची भांडी पुन्हा नव्यासारखी चमकतील.
2 चिंचेची पेस्ट-
चिंचेच्या पेस्टनेही पितळेची भांडी नवीनसारखी बनवता येतात, यासाठी गरम पाण्यात चिंच भिजवून पेस्ट बनवा, नंतर ही पेस्ट पितळी भांड्यांवर लावा, थोडा वेळ तसेच राहू द्या, नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या .
3 बेकिंग सोडा आणि लिंबू-
एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून भांड्यांवर चोळा, नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, भांडी नवीन सारखी चकचकीत होतील.
4 व्हिनेगर आणि मीठ-
पितळेची भांडी व्हिनेगरने चांगली साफ करता येतात.पितळ्याच्या भांडी व्हिनेगर आणि मीठाने घासून घ्याव्यात, नंतर थोडावेळ तसेच राहू द्या, कोमट पाण्याने धुवून स्वच्छ कराव्या. पितळ्याची भांडी चमकून निघतील.