या प्रकारे लावा Perfume, लगेच दूर होईल घामाची दुर्गंधी

बुधवार, 25 मे 2022 (12:12 IST)
हवामानात घामाचा वास येणे सामान्य आहे. अशा परिस्थितीत लोक घराबाहेर पडण्यापूर्वी परफ्यूम लावतात, पण तरीही घामाच्या वासापासून सुटका होत नाही. यामागे चुकीची पद्धत आहे. परफ्यूम लावण्याचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा तो योग्य प्रकारे लावला जातो. परफ्यूम घालण्याच्या योग्य पद्धती जाणून घेऊया-
 
घामाच्या भागावर परफ्यूम लावा
शरीराच्या काही भागांवर खूप घाम येतो. अशा स्थितीत काही वेळाने दुर्गंधी येऊ लागते, त्यामुळे शरीराच्या ज्या भागात जास्त घाम येण्याची शक्यता असते त्या जागी परफ्यूम लावावा. तज्ज्ञांच्या मते, मनगट, मान, कोपर, कपडे आणि कानाच्या मागे परफ्यूम लावणे अधिक योग्य आहे.
 
कोरड्या त्वचेवर परफ्यूम लावणे टाळा
कोरड्या त्वचेवर परफ्यूम लावल्याने त्वचा अधिक कोरडी होते आणि खाज येण्याचाही धोका असतो. या कारणांमुळे कोरड्या त्वचेवर परफ्यूम वापरणे टाळावे. ड्राय स्किन असल्यास अल्कोहल बेस्ड परफ्यूम लावायला मनाई आहे. परफ्यूम लावण्यापूर्वी त्वचेला चांगले मॉइश्चरायझ करण्याचा प्रयत्न करा. त्याला परफ्यूमच्या सुंगधाचा प्रभाज जास्त काळ टिकून राहतो. 
 
कपड्यांवर परफ्यूम लावा
घामाचा वास टाळण्याचा उत्तम उपाय म्हणजे कपड्यांवर परफ्यूम लावणे. असे केल्याने घाम आला तरी कपड्यांमधून सुगंध येत राहतो. अंगावर परफ्यूम लावल्याने खाज येण्यासारखी समस्या उद्भवू शकते. तसेच, परफ्यूमचा प्रभाव देखील लवकर नाहीसा होतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती