Masala Pasta मुलांसाठी खास मसाला पास्ता

शुक्रवार, 3 मार्च 2023 (21:23 IST)
मसाला पास्ता तयार करण्यासाठी साहित्य-
पास्ता – 2 कप
टॉमेटो – 2
कांदा – 1
मोजरिला चीज – 1 टेबलस्पून
लाल मिरची पावडर – 1 टी स्पून
आलं तुकडा – 1 इंच
हिरवी मिरची – 1
चिली फ्लेक्स – 1 चुटकी
टॉमेटो सॉस – 1 टी स्पून
मेयोनीज – 1 टी स्पून
तेल – 1 टेबलस्पून
मीठ – चवीनुसार
 
मसाला पास्ता तयार करण्याची विधी-
मसाला पास्ता तयार करण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात पाणी गरम करा आणि त्यात पास्ता टाक. आपण यात जरा तेल देखील टाकू शकतं ज्याने पास्त चिकटत नाही. पास्ता 7-8 मिनिट उकळून घ्या. आता एका गाळण्याने पास्ता काढून वरुन गार पाणी टाका. आता टॉमेटो, कांदा, हिरवी मिरची, आल्याचे तुकडे करुन मिक्सरमधून काढून पेस्ट तयार करा. आता एका कढईत तेल टाकून मध्य आचेवर गरम करा. यात पेस्ट परतून घ्या. नंतर यात मेयोनीज, सॉस, तिखट, चीज आणि मीठ घाला आणि चांगलं हालवून घ्या. आता पास्ता टाकून मिक्स करा. 2-3 मिनिटाने पास्ता तयार होईल आता यावर चीज, चिली फ्लेक्स घालून सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती