फ्लॉवर पॉटची सजावट

घराची सजावट करताना.. कितीही महागड्या फर्निचरचा वापर केलेला असला तरी घराच्या दर्शनी बाजूला फुलदानीत नेटकेपणाने सजलेली टवटवीत, ताजी फुले मन प्रसन्न करतात.. अशा फुलांचे मोल अमूल्य ठरते. हल्ली रोजच फ्लॉवर पॉट सजविणे, वा फुले बदलणे तस जिकिरीचे ठरेत. काहीजणांनी अशा फ्लॉवर डेकोरेशनचा व्यवसायही सुरू केला आहे; पण अशी होम सर्जव्हस सर्वांनाच परवडते असे नाही. फ्लॉवर पॉटमधली फुले जशी महत्त्वाची ठरतात तितकेच फ्लॉवर पॉटही महत्त्वाचा असतो. हल्ली मार्बल पॉट, चिनीमाती, फायबर, टेराकोटा, स्टील, सिरॅमिक, ग्लास, वूडन, मड, अशा विविध प्रकारचे फ्लॉवर पॉट बाजारात सहजपणे मिळतात. विविध आकारांच्या या पॉटमध्ये ठेवण्यात येणारी फुले नैसर्गिकच हवीत असे नाही. आर्टिफिशियल फुलेही यात छान सजवता येतात. मात्र कापडी, प्लास्टिकच्या या फुलांची निगराणी राखावी लागते. शक्यतो कर्टन वॉललगत, दोन भिंतींच्या मध्ये, प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला, किचन, बेडरूम, स्टडी रूम, लिव्हिंग रूममध्ये मोठाले फ्लॉवर पॉट ठेवण्याची पद्धत आहे. अनेकदा फुलांशिवाय नुसतेच डेकोरेटिव्ह अँटिक पीसही ठेवले जातात. कोणताही पॉट खरेदी करताना पडदे, भिंती, फर्निचर यांचे रंग, तो कुठे ठेवणार आहात ती जागा, किती जागा मिळणार आहे, हे लक्षात घेऊन फ्लॉवर पॉटची निवड करा.

वेबदुनिया वर वाचा