पीरियड्स दरम्यान ब्रेस्‍ट पेन? अमलात आणा हे घरगुती उपाय

पीरियड्स दरम्यान किंवा आधी अनेक महिलांना स्तनात वेदना जाणवतात. त्या दरम्यान शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असल्यामुळे स्तनात कडकपणा, वेदना किंवा सूज जाणवते. याचे मुख्य कारण शरीरात पोषणाची कमी, अनियमित आहार, आणि अधिक ताण हे असू शकतात.
 
जर आपल्यालाही हा त्रास जाणवतं असेल तर हे घरगुती उपाय अमलात आणून आपण वेदनांपासून मुक्ती मिळवू शकता.
एरंडेल व ऑलिव्ह तेल: एरंडेल तेल आणि ऑलिव्ह तेल मिक्स करून या तेलाने स्तनाची हलक्या हाताने मालीश करावी. याने आराम पडेल. 

गरम पाण्याचा ‍शेक: गरम पाण्याच्या एका भांड्यात एक कपडा टाकून तो पिळून घ्यावा नंतर तो कपडा गरम राहिलं तोपर्यंत स्तनावर ठेवावा. ही प्रक्रिया 10 मिनिटासाठी करा. याने रक्त रक्तवाहिन्या उघडतील आणि रक्त पूर्ण शरीरात प्रवाहित होईल.
 
बर्फाचा पॅक: एका स्वच्छ कपड्यात बर्फाचे घेऊन हे ब्रेस्टवर ठेवा. याने वेदना कमी होतील कारण बर्फाच्या शेकाने संकुचित झालेल्या रक्त रक्तवाहिन्या खुलतील.

बडी शेप:  बडी शेपने वेदना आणि सूज दोन्ही कमी होते. 1 कप पाण्यात बडी शेप घालून ते पाणी उकळवावे. नंतर गाळून पिऊन घ्यावे.
 
पिंपळाची पाने: एक पॅनमध्ये पिंपळाची पाने ठेवून त्यावर काही थेंब मोहरी किंवा ऑलिव्ह तेल टाकून गरम करा. नंतर हे पाने स्तनावर ठेवून शेका. या पानांनी 4 ते 5 वेळा शेका.
 
केळी: केळ्यात भरपूर मात्रेत पोटॅशियम आढळतं. केळी खाल्ल्याने स्तनात साठवलेलं रक्त प्रवाहित होऊ लागतं आणि वेदना कमी होतात. 

नारळ पाणी: नारळ पाण्यातही पोटॅशियमची मात्रा भरपूर असते म्हणून नारळ पाणी पिण्याने वेदना कमी होतात. 
जवसाच्या बिया: जवसाच्या बियांचे रोज सेवन केले पाहिजे. याने वेदना ‍कमी होतात. 
 
पालेभाज्या: हिरव्या पाले भाज्या, ब्रोकली इ भाज्या शरीरातील एस्ट्रोजन लेवल कमी करतं ज्याने वेदना कमी होतात.

वेबदुनिया वर वाचा