हललें जरासें चांदणे

मंगळवार, 15 जून 2021 (16:01 IST)
हललें जरासें चांदणें 
भरल्या दिशांच्या पापण्या,
 होतील वर्षे मोकळी हरवून 
त्या साऱ्या खुणा.
 
तें पान पिकलेलें तिथें केसांत कां मीं घातलें,
 कां बोललें मनमोकळी, कळलें न कां तें सांग ना ? 
 
नव्हतें तुला का ठाउकें ,
असलें कुणाचें वागणें;
तूं भाबडा इतका कसा, 
कळली न का ती वंचना?
 
अन् असतें जरी मी यायची,
 "येईन मी” म्हणतें कशी? 
तेव्हांच होती यायला तुजला नको का कल्पना.
 
काळोख व्हावा पेटता अन् पेटुनी जावें मुळीं.
 हैं वाटलें जेव्हां असें, तेव्हाही  ना घडला गुन्हा?
 
त्याचेच डोळे घेउनी आलास तूं तेथेंच का? .
..त्याचेच ते डोळे मुळीं;त्याचेच ते;त्याचेच ना?
 
विंदा करंदीकर
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती