माझी आई

बुधवार, 9 जून 2021 (16:30 IST)
माझी आई
तिच्या विषयी बोलायच ठरवलं की
शब्द मुकेपण घेतात 
अण डोळे भरून बघाव स वाटलं 
की डोळेच भरून येतात 
कसं  कुणाला सांगू ती ही शिथिल पडते, 
हो माझी आई पण थकते.
 
सहाशष्ट वर्षाची ती ही झाली,
 परंतू सोळावं लागल्या सारखी वागते,
 शरीर साथ देत नाही तरी मनाच्या शक्ती ने जगते,
 हो माझी आई पण थकते.
 
एक काम झाल नाही, 
दुसऱ्या कामा साठी पदर खोचते 
"सर्वे नीट पार पडेल न ग मिनू ?" 
एक सारखे मला विचारते ,
"हो ग आई होणार सगळ व्यवस्थित " हे उत्तर ऐकायला 
दिवसातून चार वेळा तरी फोन करते, 
हो माझी आई पण थकते.
 
अन्नपूर्णा माझी आई, 
घड्याळाच्या ठोक्या ला घाबरते लटपटल्या हाता -पाया ने 
वेळेत संपूर्ण स्वयंपाक करते,
 सर्वांना घेउन चालते न कसलीचही अपेक्षा करते,
 हो माझी आई पण थकते.
 
"कधी पर्यंत ग आई" ! .
माझे हे प्रश्न ही तिला तुच्छ वाटते ,
जवाबदारी पार पडल्या चे तृप्तिने तिचे तेज लखलखते,
 कुणाशी काहीच न बोलता मुकाट्याने कर्तव्य पार पाडते 
देवा वर सर्व भार सोडून एक स्मित हास्य हसते,
 "तूच करता तूच करविता " 
असे म्हणून देवाचे आभार मानते पण खरच . 
माझी आई पण थकते ,
माझी आई पण थकते
 
सौ.रिता माणके तेलंग 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती