जातक कथा मुका राजपुत्र

बुधवार, 9 जून 2021 (08:40 IST)
काशीच्या महाराणीला काहीही अपत्ये नहव्ते.त्या शीलवान असल्याने त्यांनी नियोगाच्या माध्यमाने गर्भधारण केले आणि एक गोंडस मुलाला जन्म दिले. त्यांनी त्याचे नाव तेमिय ठेवले.
 
तेमिय ला राजसी सुखाचा काही आकर्षण नसल्याने आणि राज्य सांभाळावे   लागू नये या साठी त्यांनी सोळा वर्ष मूक आणि अपंग राहण्याचे नाटक केले.
लोकांनी त्याला राजा म्हणून अपात्र ठरवले आणि राजाला सूचना केल्या की अशा मुलाला स्मशानात पाठवून त्याला पुरवून द्यावे.
 
राजा ने या कामासाठी सुनंद नावाच्या माणसाची निवड केली.सुनंद राजपुत्राला  रथावर घेऊन स्मशानात गेला आणि तेमिय ला जमिनीवर झोपवून त्याला पुरविण्यासाठी खडडा खणू लागला.   
 
एवढ्यात तेमिय उठून सुनंदच्या पाठीशी जाऊन उभा राहिला आणि त्याला म्हणाला,की मी मुका नाही आणि अपंग देखील नाही.त्याला मुळात सन्यास घ्यायचे आहे.तेमियचे बोलणे ऐकून सुनंदने त्यांचा शिष्य बनण्याची इच्छा सांगितली.तेमियने त्याच्या इच्छेचा मान ठेवून त्याला आपले शिष्य करून घेतले आणि सुनंद ला राजमहालातून महाराज आणि महाराणीने बोलवायला सांगितले.
सुनंद सह राजा राणी तेमिय ला भेटावयास आले.त्यांना तेमिय ने सन्यास  घेण्याचे समुपदेश दिले. त्याचे बोलणे ऐकून राजा राणी आणि इतर मंडळी देखील तेमिय सह संन्यासी झाले.
 
कालांतराने तेमिय एक महान संन्यासी म्हणून प्रख्यात झाले. 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती