वाईट वाटून घ्यायचं नाही, अस ठरवते मनाशी,
काही न काही मात्र अडकत कंठाशी,
बोलून उगा वाईट व्हायचं नाही,
आपली पर्वा कुणा दुसऱ्यालाही नाही,
हा माझा मार्ग ऐकला, हे खरं आहे,
इतरांच्या गोष्टीत नाक खुपसण निरर्थक आहे,
जे जे होईल ते ते आपण नीट पाहावं,
होता होईस्तोवर त्यातून मात्र शिकावं!
मगच होईल जीवन सुकर, अन बिना तक्रारी च!