असा हा आषाढ देऊन जातो खुप काही

सोमवार, 12 जुलै 2021 (19:28 IST)
आषाढात म्हणे पावसाचे खरं रूप दिसे,
शेत माळ्यावर धोधो तो ही बरसे,
शेतकरी जातो सुखावून फार फार,
गर्भातून घरणीच्या फुटतो हिरवा अंकुर,
आषाढा चे मेघ असतात काळेभोर,
येती पाऊस घेऊन, झोडपतो घनघोर,
पानोपानी चिंब होऊनी गाती पावसाचे गीत,
अशीच असते सखी आषाढा ची न्यारी रीत,
असा हा आषाढ देऊन जातो खुप काही,
वर्षभर बळीराजा, आषाढा चीच वाट पाही.
....अश्विनी थत्ते

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती