होत्याच तुझ्या कवीता माझ्या करीता नितांत सुंदर,
झिरपत होत्या आत आंत माझ्यात निरंतर,
कवितांचे गीत होऊन मी गुणगुणत होतें कित्येकदा,
जगत होतें त्यास, आपल्यातच रमत सर्वदा,
मिळणारा आनंद दिसत होताच की सहज इतरांना,
तुलाच टिपता येत नव्हता तो,का रे सांग ना?
तक्रार कधीच नव्हती माझी तेव्हाही अन आजही,
ऐकावं वाटत होतं तू ते,सवडीन तुझ्या केव्हाही,
असो शिकविले मजसी जगावं कसं ह्या कवितांनी,
फार होती तीच प्रेरणा मजसाठी,जगवल आठवणींनी!