×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
मी फूल तृणांतिल इवलें
शुक्रवार, 25 जून 2021 (16:22 IST)
मी फूल तृणांतिल इवलें
जरी तुझिया सामर्थ्यानें
ढळतील दिशाही दाही
मी फूल तृणांतिल इवलें
उमलणार तरीही नाही.
शक्तीनें तुझिया दिपुनी
तुज करीतील सारे मुजरे
पण सांग कसें उमलावें
ओठांतिल गाणें हसरें?
जिंकील मला दवबिंदू
जिंकील तृणाचें पातें
अन् स्वत:स विसरून वारा
जोडील रेशमी नातें
कुरवाळित येतील मजला
श्रावणांतल्या जलधारा
सळसळून भिजलीं पानें
मज करतिल सजल इषारा
रे तुझिया सामर्थ्यानें
मी कसें मला विसरावें ?
अन् रंगांचें गंधांचें
मी गीत कसें गुंफावें ?
येशील का सांग पहाटे
किरणांच्या छेडित तारा;
उधळीत स्वरांतुन भवतीं
हळु सोनेरी अभिसारा ?
शोधीत धुक्यांतुन मजला
दवबिंदू होउनि ये तूं
कधि भिजलेल्या मातीचा
मृदु सजल सुगंधित हेतू !
तूं तुलाच विसरुन यावें
मी तुझ्यात मज विसरावें
तूं हसत मला फुलवावें
मी नकळत आणि फुलावें
पण तुझिया सामर्थ्यानें
ढळतील दिशा जरी दाही
मी फूल तृणातिल इवलें
उमलणार तरीही नाहीं.
— मंगेश पाडगावकर
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला बळी
चीनची तिबेटमधली बुलेट ट्रेन अरुणाचल प्रदेशाला खेटून जाणार
अजित पवारांच्या CBI चौकशीची मागणी भाजपने का केली आहे?
ट्विटरने आयटी मंत्री रविशंकर यांचे खाते 1 तासासाठी ब्लॉक केले
शाहरुख खान (SRK)ची सिनेसृष्टीत 30 वर्षे पूर्ण
नक्की वाचा
चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या
थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा
मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi
अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये
पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध
नवीन
Sindoor म्हणजे काय? कोणत्या फळाच्या बियांपासून बनवले जाते सिंदूर, जाणून घ्या सर्व काही
नाश्त्यात बनवा ब्रेड उपमा रेसिपी
Rabindranath Tagore Jayanti 2025 Speech : गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यावर भाषण
उन्हाळ्यात दम्याच्या रुग्णांनी आपल्या आरोग्याची काळजी अशा प्रकारे घ्यावी
बारावी नंतर हा अभ्यासक्रम करा परदेश प्रवासाचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल
अॅपमध्ये पहा
x