आई आणि बाबा

वेबदुनिया

शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2012 (16:02 IST)
WD
WD

आईने बनवलं,

बाबांनी घडवलं,

आईने शब्दांची ओळख करून दिली,

बाबांनी शब्दांचा अर्थ समजवला

आईने विचार दिले,

बाबांनी स्वातंत्र्य दिले,

आईने भक्ती शिकवली,

बाबांनी वृत्ती शिकवली,

आईने लढण्यासाठी शक्ती दिली,

बाबांनी जिंकण्यासाठी नीती दिली,

त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या

हाती आहे

म्हणून तर माझी आज ओळख आहे.

वेबदुनिया वर वाचा