अंतराळ संशोधन संस्था नासाने 12 ऑगस्ट 1960 रोजी 'एक्सप्लोरर 1' नावाचे पहिले कम्युनिकेशन सॅटेलाईट प्रक्षेपित केले. मेलर पॉलिस्टरपासून बनलेल्या या एका फुग्याच्या आकाराच्या उपग्रहाचा व्यास सुमारे 30.5 मीटर (100 फूट) होता. उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर त्याद्वारे एका ठिकाणावरून दुस-या केंद्रावर रेडीओ लहरींच्या प्रक्षेपणासह फोन व टिव्ही सिग्नल्सही प्रक्षेपित केले जाऊ शकत होते.
हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेतून फिरताना जमीनीवरूनही सहज दिसत असल्याने तो लोकांसाठी कुतुहलाचा विषय ठरला होता.
आज या उपग्रहाच्या प्रक्षेपणास 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर जगात संचार क्रांतीचा वेगाने विस्तार झाला. मोबाईल आणि ई-मेलच्या या जगाची मुहुर्तमेढच जणू या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर आलेल्या यशाने रोवली गेली.