कृती-
सर्वात आधी चिकनचे तुकडे एका भांड्यात ठेवा. आता चिकनवर लिंबाचा रस, लाल तिखट, मीठ आणि आले-लसूण पेस्ट घालून मॅरीनेट करा आणि ३० मिनिटे बाजूला ठेवा. तसेच एका भांड्यात दही, मीठ, धणे पूड, तिखट घाला आणि चांगले फेटून घ्या.मध्यम आचेवर एका पॅनमध्ये तेल घाला आणि ते गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम होताच त्यात कांदा घाला आणि परतून घ्या. कांदा परतल्यांनंतर तो थंड करा आणि ग्राइंडरच्या भांड्यात त्याची पेस्ट बनवा.आता त्याच पॅनमध्ये थोडे तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात मॅरीनेट केलेले चिकन घाला आणि ते सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. चिकन भाजल्यानंतर ते बाहेर काढा आणि प्लेटमध्ये ठेवा. आता त्याच पॅनमध्ये पुन्हा तेल घाला आणि ते गरम करा. गरम तेलात तमालपत्र, हिरवी वेलची, काळी वेलची, दालचिनी घाला आणि हलके तळा. तसेच आले-लसूण पेस्ट घालून हलके परतून घ्या. यानंतर टोमॅटो, कसुरी मेथी आणि दही घाला आणि ढवळत शिजवा. आता त्यात कांद्याची पेस्ट घाला, चांगले मिसळा आणि २ मिनिटे परतून घ्या. ग्रेव्ही तयार झाल्यानंतर, भाजलेले चिकन घाला आणि चांगले मिसळा.हिरव्या मिरच्या आणि पाणी घालून चांगले मिसळा. झाकण ठेवून २ मिनिटे शिजू द्या. परत थोडी कसुरी मेथी घाला आणि आणखी काही वेळ शिजवा. चिकन पूर्णपणे शिजल्यानंतर गॅस बंद करा. तर चला तयार आहे मेथी चिकन रेसिपी, पोळीसोबत नक्कीच सर्व्ह करा.