न्याहारीसाठी बनवा चविष्ट अंड्याचे कटलेट

रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (17:50 IST)
जर आपल्याला न्याहातरीत अंडी खाण्याची सवय असेल तर आपण अंड्याचे कटलेट बनवू  शकता. ही प्रोटीनयुक्त डिश खाल्ल्यानंतर आपल्याला अजून काही खाण्याची इच्छा होणार नाही. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य- 
 
7 उकडलेली अंडी, 2 उकडलेले बटाटे, 1/2 टीस्पून आलं , 3 हिरव्या मिरच्या, 1 किंवा 1/2 लसूण, 1 मोठा कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, 1 कप, तेल, 1 टीस्पून गरम मसाला , 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर, 1/2 कप ब्रेड क्रम्ब्स, 1/2 टीस्पून धनिया पाउडर, 1/2 टीस्पून लाल तिखट
 
कृती-
सर्वप्रथम एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून त्यात कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता, मीठ ,काळी मिरपूड आणि गरम मसाला घाला आणि परतून घ्या. आता हे साहित्य  एका भांड्यात काढून घ्या.  उकडलेली अंडी  समान भागांमध्ये कापून अंड्यातील पिवळा भाग काढून टाका. उकडलेला बटाटा आणि अंड्यातील पिवळा भाग  घ्या आणि आधीच शिजवलेल्या साहित्यात मिसळून त्यात कोथिंबीर आणि मीठ घालून चांगल्या प्रकारे मळून घ्या. त्याचे लहान गोळे बनवा, हे गोळे अंड्यांच्या पांढऱ्या भागात ठेवा आणि त्याचे बॉल बनवून बंद करून घ्या. 
 एका कढईत तेल तापत ठेवा. आता अंड्याचा कच्चा पिवळा भाग काढून त्यात हळद आणि लाल तिखट, मीठ घालून मिक्स करा. अंड्याचे बनवलेले गोळे या मिश्रणात बुडवा .नंतर, ब्रेड क्रम्ब्स मध्ये गुंडाळून हलक्या हातांनी गरम तेलात सोडा आणि  हलकं सोनेरी रंग येई पर्यंत  तळून घ्या. गरम कटलेट सॉस सह सर्व्ह करा.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती