चव दक्षिणेची : मीन पीरा

बुधवार, 16 मे 2018 (15:48 IST)
हे बनविण्यासाठी, तुम्हाला कोणताही छोटा मासा एंकोव्ही किंवा सार्डिनची गरज भासेल. मासा स्वच्छ करा. सार्डिनचा वापर करण्यात येत असल्यास, प्रत्येक माशाचे दोन तुकडे करा. 
 
तुम्हाला खालील गोष्टीही लागतील: 
किसलेलं खोबरं – दोन कप 
आलं - 2 इंच
लसूण - अंदाजे 12 पाकळ्या 
हिरव्या मिरच्या - 4 किंवा 5
कढीपत्त्याची पाने - थोडी
हळद - ½ चमचा
मेथी पूड  - ½ चमचा
मीथ - चवीनुसार
चिंच (कोकम) - 3 किंवा 4 तुकडे
खोबरेल तेल - 1 चमचा
 
कृती : मासा सोडून बाकी सगळे पदार्थ एकत्र करा. ते चांगले एकजीव झाल्यावर, त्यात माससा घालून पुन्हा हळूवारपणे एकत्र करा. नंतर एक कप पाणी घाला. मासा शिजेपर्यंत आणि पाणी निघून जाईपर्यंत झाकण घालून मंद आचेवर शिजवा. 

साभार : श्रीमती.लेलु रॉय

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती