साहित्य : 2 वाटी शिजवलेला मोकळा भात, पाऊणवाटी चिंचेका कोळ, पाव वाटी गूळ बारीक केलेला, पाव चमचा हळद, 3 ते 4 लाला सुक्या मिरच्या, पाव वाटी भिजवेली चणाडाळ, खोबर्याचे काप पाव वाटी, दाणे पाव वाटी. कढीपत्ता व हिंग फोडणीसाठी, चवीनुसार मीठ व तिखट. कोथिंबीर बारीक चिरून.
कृती : सर्वप्रथम कढईत तेल जिरं, कढीपत्ता व हिंग घालून फोडणी करा. दाणे व खोबर्याचे तुकडे घाला. परतून घ्या. लाल मिरचीचे तुकडे घाला व भिजवलेली चणा डाळ घाला. तिखट हळद, चिंचेचा कोळ घाला. गूळ घाला व उकळी येऊ द्या. वरून शिजवलेला भात घाला अंदाजे मीठ घाला चांगले कालवून एक वाफ येऊ द्या. वरून कोथिंबीर सजवून खायला द्या.