फनी उखाणे

निळे निळे डोंगर आणि हिरवे हिरवे रान,
…रावांचा आवडता छंद म्हणजे सतत मदिरापान.
 
आमच्या ह्यांचे घर होते लाकडाचे...
आमच्या ह्यांचे घर होते लाकडाचे...
..... नावा घेते सासू बाईंच्या माकडाचे.
 
आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
........... चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा! "
 
महादेवाच्या पिंडी समोर उभा आहे नंदी
.... मास्तरांचे नाव घेते
आयताचे क्षेत्रफळ - लांबी गुणिले रुंदी
 
डाळीत डाळ तुरीची डाळ,
हिच्या मांडीवर खेळवीन एका वर्षात बाळ
 
गोव्यावरून आणले काजू,
.. रावांच्या थोबाडीत द्यायला मी का लाजू
 
पुण्यात आमचा बंगला उभा आहे ऐटीत
जळू नका लोकहो......... राव आहेत आयटीत
 
घराबाहेर पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
.......... ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती