प्रेम आहे की नाही समजून घेण्यासाठी साठी टिप्स

बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (09:40 IST)
आपण एखाद्या वर प्रेम करता परंतु आपल्याला हे माहित नाही की तो देखील आपल्यावर प्रेम करतो किंवा नाही. अशा परिस्थितीत काय करावं. बऱ्याच वेळा ती व्यक्ती आपल्याला काही इशाऱ्यात सांगण्याचे प्रयत्न करते परंतु ते समजत नाही या साठी काय करावे. आम्ही आपल्याला काही टिप्स सांगत आहोत. ज्यामुळे आपल्याला हे समजेल की आपण ज्याच्या वर प्रेम करता ती देखील आपल्यावर प्रेम करते चला तर मग जाणून घेऊ या.   
 
* व्यवहारात बदल होतो- 
आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीला देखील आपण आवडत असाल तर तिच्या व्यवहारात बदल होऊ लागतो. कधीं आपण हसत असाल तर ती बघू लागते किंवा आपले लक्ष तिच्या कडे केंद्रित करण्याचा प्रयत्न करते.  
 
* एक सारखे वाटणे- 
जर आपण कोणाला आवडता तर ती व्यक्ती लपून छपून आपल्याला बघेल. दुरून आपल्याकडे निरखून बघतील आणि जे आपल्याला तिच्या बद्दल वाटते तेच तिला पण आपल्याबद्दल वाटू लागत.
 
* डोळ्यातून बोलणे -
बऱ्याच वेळा असे होते की एखाद्या व्यक्तीला आपण आवडता पण तो स्पष्टपणे बोलत नाही तर तो डोळ्याने इशारे करून खुणावतो किंवा सांगण्याचा प्रयत्न करतो.  
 
* नेहमी समोर असणे- 
एखादी व्यक्ती जी आपल्याला पसंद करते ती आपल्या अवती भवती राहण्याचा प्रयत्न करते जेणे करून आपण तिचा समोर राहावे.  
 
* जवळ येण्याचा प्रयत्न करेल -
एखादी व्यक्ती जी आपल्याला पसंत करते ती आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करते. आपण जिथे जाता ती आपल्या सह येण्याचा प्रयत्न करते मग ती लिफ्ट असो किंवा दुकान. तेव्हा समजावं की तिला आपण आवडता.  
 
* बोलण्याची पद्धत -
जी व्यक्ती आपल्याला पसंत करते ती कधी आपल्याला दुसऱ्या कोणासह बोलू देऊ शकत नाही तर ती चिडेल आणि तिच्या बोलण्याच्या स्वर नाराजीचा दिसेल. आपल्या सह बोलताना प्रेमाने बोलेल आणि आपण इतर कोणाशी बोलू लागला की स्वर वाढतो. तर समजावं की तिचे देखील आपल्यावर प्रेम आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती