'टिन एज' 'लव्ह' धोकादायक

पौंगडावस्थेत (ज्याला आजच्या भाषेत 'टिनऐजर्स' म्हणतात) प्रेमाची बाधा झाली नसेल अशी व्यक्ती विरळाच म्हणावी लागेल. वयाच्या 12 ते 14 वर्षांत प्रेम ही भावना मनात जागृत होऊ लागते. आपल्या आयुष्यातील हे अपघाती वळणच असते. या वयातही हल्ली अनेक अफेअर्स होत आहेत. त्याला 'टीन एज लव्ह अफेअर्स' असे म्हणतात. या वयात मुले मागचा-पुढचा कुठलाच विचार करत नाही. कारण 'लव्ह फिवर' त्याच्या नसांनसात भिनलेला असतो. परंतु, या वयातील प्रेम धोकादायी ठरू शकते. पश्चातापाची पाळी आणू शकते. कारण या वयात प्रेमापेक्षा शारीरिक आकर्षण जास्त असते. याच विषयावर गेल्या काही वर्षात 'एक छोटीशी लव्हस्टोरी!' हा चित्रपट येऊन गेला. 

'जिना मरना तेरे संग' असल्या शपथाही ही 'टीन एजर्स' मंडळी खाताना दिसतात. मानसोपचार तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार या वयात प्रेम करण्‍यार्‍या मुला-मुलींमध्ये निर्माण होणार्‍या भावनांचा आलेख चांगलाच उंचावलेला असतो. आपल्या जोडीदाराला मिळवण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी ते काहीही करण्यास तयार असतात. त्यांच्या प्रेमाआड येणारा प्रत्येक जण हा त्यांचा शत्रू आहे, असे त्यांना वाटत असते. प्रेमासाठी आई-वडील, भाऊ-बहिण, मित्र- मैत्रिणी यांच्याशीही ते बंड पुकारत असतात. प्रेमासाठी घरदारच काय जगच सोडाण्यापर्यंत त्यांची मजल जाऊ शकते. काही मुले तर मनाविरूध्द झाले म्हणजे पेटून उठतात. तेव्हा ते स्वत:च्या जीवाचेच काय तर आपल्या आई- वडिलाचे कमीजास्त करायला मागे पुढे बघत नाही.

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात अशीच एक घटना घडली होती. मुल तालुक्यातील एका गावात राहणारी 15 वर्षाची गायत्री नामक तरूणी एका विवाहीत तरूणाच्या प्रेमात पडली. तो विवाहीत तरूण तिला इतका आवडला की त्याच्यासाठी काहीही करायला ती तयार झाली. गायत्रीच्या आई- वडिलाना हे प्रेमप्रकरण समजले तेव्हा त्यांच्या पायाखालून वाळू सरकली.

आई-वडिलानी तिला समजावण्याचे लाख प्रयत्न केले. परंतु, प्रेमांध गायत्रीला आपले आई-वडील आपल्या प्रेमातील अडसर वाटले. एके दिवशी तिने आपल्या विवाहित प्रियकराच्या मदतीने पालकाना झोपेतच यमसदनी पाठवले व प्रियकरासोबत पळ गाढला. गायत्रीच्या विवाहित प्रियकराने तिचा उपभोग घेतला आणि नंतर वार्‍यावर सोडून दिले. गायत्रीला तिची चूक लक्षात आली. परंतु, तोपर्यंत फार उशीर झाला होता.

टिन एजर्स मुले- मुली शारीरीक वा मानसिक कोणत्याच दृष्टिने परिपक्व झालेले नसतात. त्यामुळे ते रस्ता चुकतात. आपल्याला जायचे आहे कोठे आणि आपण कोणत्या रस्त्याने जात आहोत याचे भान त्यांना नसते. म्हणूनच मुले- मुली मोठी होतात तशी पालकांची जबाबदारीही वाढत असते.

 
WD
पालकांनी घ्यायची काळजी
आपली मुले शाळा, महाविद्यालय, क्लासला नियमित व वेळवर जातात किंवा नाही, याकडे पालकानी लक्ष दिले पाहिजे. आपल्या मुलांच्या शाळा, कॉलेजव क्लासच्या वेळा लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आपली मुले कोणाशी मैत्री करत आहेत याचे भान पालकानी ठेवले पाहिजे. पालकांनी स्वत: मुलांच्या शाळेत जाऊन तपास केला पाहिजे. मुलांच्या वागण्या, बोलण्याकडे बारीक लक्ष दिले पाहिजे. मुल प्रेमात पडले असल्यास त्याचे कारण शोधले पाहिजे. मुलाची चूक लक्षात आल्यानंतर त्याला प्रेमाने विश्वासात घेऊन समज दिली पाहिजे.

पालक काय करू शकतात?
* मुलांना प्रेमाने विश्वासात घेऊन त्याच्या हातून कोणती चूक घडली आहे. जाणून घ्या. चूक जाणून घेतल्यानंतर त्यांच्यासाठी या वयात ही किती हानीकारक गोष्ट आहे याची जाणीव करून द्या.
* आपला मुलगा-मुलगी शाळा, महाविद्यालयात काय करते, हे आधी त्यांच्या मित्रांकडून जाणून घ्या.
* या वयात मुलांना पालकानी मोबाइल घेऊन देऊ नये.
* रात्री उशीरा मुले घरी परतत असतील तर ते एवढा वेळ कुठे होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
* मुलांशी बोलताना त्यंच्या भावना दुखावल्या जाणार नाहीच याची काळजी पालकानी घेतली पाहिजे.

प्रेम चुकीचे नाही. परंतु, प्रेम केव्हा करायचे हे प्रत्येक मुला- मुलीने आपली जबाबदारी ओळखून केले पाहिजे. प्रेमासाठी योग्य वय व योग्य जोडीदारही आवश्यक असतो.

वेबदुनिया वर वाचा