Parenting Tips :मुलांची बुद्ध्यांक पातळी वाढवण्यासाठी पालकांनी या टिप्स फॉलो कराव्यात

बुधवार, 18 मे 2022 (15:14 IST)
सर्व पालकांना त्यांच्या मुलाने वाचन आणि लेखनात हुशार व्हावे तसेच त्याची बुद्ध्यांक पातळी चांगली असावी असे वाटते. मुलाला हुशार आणि स्मार्ट बनवण्यासाठी पालक लहानपणापासूनच आपल्या मुलाला बदाम, अक्रोड तर कधी च्यवनप्राश खाऊ घालतात. पण मुले स्मार्ट असणे आणि मुलांची बुद्ध्यांक पातळी वाढणे यात फरक आहे. IQ किंवा Intelligent Quotient बुद्ध्यांक हा एक गुण आहे जो मुलाला इतर मुलांपेक्षा वेगळा बनवतो. चांगली गोष्ट म्हणजे बुद्ध्यांक सुधारण्यासाठी वयाची मर्यादा नसते. चला जाणून घेऊया काही टिप्स ज्यांचा अवलंब करून करून पालक आपल्या मुलाचा बुद्ध्यांक कसा सुधारू शकतात.  
 
1 कोणते ही वाद्ये वाजवायला शिका - 
मुलाच्या मेंदूच्या विकासासाठी ही एक उत्तम क्रिया असू शकते. या उपक्रमामुळे मुलाची बुद्ध्यांक पातळी तर वाढतेच शिवाय गणिती कौशल्येही विकसित होतात.यासाठी तुम्ही तुमच्या मुलाला गिटार, सितार, हार्मोनियम असे कोणतेही वाद्य वाजवायला शिकवू शकता.
 
2 खेळ शिकवा-
मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठीही खेळणे आवश्यक आहे. कधी-कधी मुले खेळ-खेळातून अनेक गोष्टी शिकतात. त्यामुळे पुढच्या वेळी तुमच्या मुलाचा उत्साह आणि बुद्ध्यांक पातळी वाढवण्यासाठी तुम्हीही त्याच्यासोबत खेळले पाहिजे. 
 
3 ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स-
ओमेगा-3 फॅटी अॅसिड मुलांच्या मेंदूसाठी चांगले असतात. वास्तविक DHA मुलांच्या मेंदूच्या विकासात खूप मदत करते. मुलाच्या शरीरातील DHA ची पातळी कमी असल्यास स्मरणशक्ती आणि वाचन क्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे मुलांच्या आहारात ओमेगा 3 फॅटी अॅसिडचा समावेश जरूर करावा.
 
4 गणिताचे प्रश्न सोडवा-
मुलाला खेळातून पहाडे खेळायला लावा किंवा खेळातून प्रश्नांची बेरीज-वजाबाकी करा. दररोज 10 ते 15 मिनिटे असे केल्याने मुलाची बुद्ध्यांक पातळी लक्षणीय वाढेल. याशिवाय आजकाल पालकही आपल्या पाल्याची बुध्यांक पातळी वाढवण्यासाठी अॅबॅकसचा अवलंब करत आहेत. 
 
5 दीर्घ श्वास घेणे-
डीप ब्रीदिंग घेणं हे ब्रेन हॅकपैकी एक आहे. दीर्घ श्वास घेतल्याने चांगले विचार मनात निर्माण होतात. याशिवाय, मुलाची प्रत्येक गोष्टीत लक्ष केंद्रित करण्याची शक्ती वाढवण्याबरोबरच तणावातूनही सुटका मिळते. यासाठी, दररोज सकाळी किंवा संध्याकाळी नियमितपणे 10 ते 15 मिनिटे मुलासोबत दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा.
 
6 माईंड गेम्सचा वापर करा -
मुलांची बुद्ध्यांक पातळी वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत बुद्धिबळ सारखे खेळ खेळा. अशा खेळांमुळे मुलांचा मानसिक विकास होण्यास मदत होते.
 

वेबदुनिया वर वाचा