सोप्या किचन टिप्स

शुक्रवार, 14 मे 2021 (22:38 IST)
आम्ही आपल्याला काही सोप्या किचन टिप्स सांगत आहो. या मुळे आपले काम अधिकच सोपे होतील.
 
* लसूण चटकन सोलण्यासाठी लसूण गरम करून घ्या. लसूण चटकन सोलले जाईल. 
 
* हरभरे चटकन भिजण्यासाठी त्यांना गरम उकळत्या पाण्यात भिजत घाला. हरभरे चटकन भिजतात आणि फुगतात देखील लवकर. 
 
* कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येऊ नये या साठी  कांदा कापण्यापूर्वी फ्रिझर मध्ये 10 ते 15 मिनिटे थंड होण्यासाठी ठेवा. किंवा व्हिनेगर आणि पाण्याच्या घोळत बुडवून ठेवल्याने देखील डोळ्यातून पाणी येणार नाही. 
 
* दही जमविण्यासाठी दुधाला कोमट करा त्यात 1 चमचा दही मिसळून झाकून ठेवा. हे भांडे प्रेशर कुकर मध्ये ठेवा. दही लवकर जमेल.  
 
* धान्याला कीड लागू नये या साठी धान्यात कडुलिंबाची पाने वाळवून धान्यात घालून ठेवा कीड लागणार नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती